जय शहांनी पेटारा उघडला, देशांतर्गत क्रिकेटपटूंना मालामाल करणार, एका खेळाडूला किती रुपये मिळणार?

| Updated on: Sep 20, 2021 | 4:45 PM

BCCI चे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सोमवारी एक ट्वीट करत बीसीसीआयकडून स्थानिक क्रिकेटपटूंना सामन्यानंतर मिळणारी रक्कम वाढवणार असल्याचं स्पष्ट केलं.

जय शहांनी पेटारा उघडला, देशांतर्गत क्रिकेटपटूंना मालामाल करणार, एका खेळाडूला किती रुपये मिळणार?
BCCI
Follow us on

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्थानिक क्रिकेटपटूंसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. स्थानिक क्रिकेटपटूंची मॅच फी अर्थात सामन्यानंतर मिळणारी रक्कम वाढवण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. बोर्डाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सोमवारी (20 सप्टेंबर) एक ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. यामध्ये त्यांनी बोर्डाने स्थानिक क्रिकेटपटूंची मॅच फि वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं आहे.  जय शाह यांनी दिलेल्या माहितनुसार 40 हून अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंना 60,000 रुपये, 23 वर्षाखालील खेळाडूंना  25,000 रुपये आणि 19 वर्षाखालील खेळाडूंना 20,000 रुपये इतकी रक्कम बोर्ड मॅच फी म्हणून देणार आहे.

2019-20 या वर्षात स्थानिक क्रिकेट सामने रद्द झाले होते. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे क्रिकेटपटूंना कोरोना महामारीमुळे स्थगित झालेल्या सीजनचा भरपाई म्हणून 2020-21 मध्ये मॅच फिमध्ये 50 टक्के वाढ दिली जाणार आहे. जय शाह यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मला स्थानिक क्रिकेटपटूंच्या सामन्यानंतर मिळणाऱ्या रकमेत वाढ झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. वरिष्ठ –  60,000 रुपये (40 ,सामन्यांहून अधिक),  23 वर्षाखालील- 25,000 रुपये, 19 वर्षाखालील- 20,000 रुपये.’

वर्षभरात 2000 हून अधिक स्थानिक क्रिकेट सामने

बीसीसीआने दिलेल्या माहितीनुसार 2021-22 सीजनमध्ये सर्व वयांतील खेळाडूंचे मिळून 2 हजार 127 सामने खेळवले जाणार आहेत. ज्यात सर्वांत अधिक काळ रणजी ट्रॉफीची स्पर्धा चालणार आहे. तीन महिने चालणारी ही स्पर्धा झाल्यानंतर एक महिनाभर विजय हजारे ट्रॉफीची स्पर्धा चालेल.

अशा पार पडती स्पर्धा

21 सप्टेंबर 2021: सीनियर महिला वनडे लीग

27 ऑक्टोबर, 2021: सीनियर महिला वनडे चँलेंजर ट्रॉफी

20 ऑक्टोबर – 12 नोव्हेंबर 2021 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी

16 नोव्हेंबर 2021- 19 फेब्रुवारी 2022: रणजी ट्रॉफी

23 फेब्रुवारी 2022- 26 मार्च 2022: विजय हजारे ट्रॉफी

अंडर-16 टूर्नामेंटवर प्रश्नचिन्ह

स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले असले तरी अंडर-16 टूर्नामेंट खेळवण्याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही. याचे कारण कोरोना प्रतिबंधक लस अजूनही 18 वर्षाखालील नागरिकांना उपलब्ध नसल्याने खेळाडूंच्या प्रकृतीची काळजी घेता ही स्पर्धा होण्यालर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  सध्या आयपीएल स्पर्धा युएईत सुरु आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर टी-20 विश्वचषकाचे सामनेही ऑक्टोबरमध्ये यूएई येथेच पार पडणार आहे.

हे ही वाचा :

तालिबानकडून IPL बॅन, चिअर लीडर्स डोळ्यात खुपतात? अफगाणिस्तानमध्ये आयपीएलचे ढोल थंडच

IPL 2021: दुखापतग्रस्त रायडूबद्दल मोठी अपडेट, पत्रकार परिषदेत समोर आली माहिती

या 2 खेळाडूंमुळे मुंबईचा पराभव करु शकलो, विजयानंतर MS धोनीची प्रतिक्रिया

(BCCI announces hike in match fee for domestic cricketers)