AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेट जगतातील सर्वात छोटा सामना, अवघ्या 7 धावांवर संघ ऑलआउट, प्रतिस्पर्धी संघ झटपट विजयी

विचार करा एखादा सामना सुरु होण्याची तुम्ही वाट पाहत असता आणि काही कामामुळे तुम्ही थोडा उशीरा सामना पाहायला घेता पण तोवर कळतं की सामना सुरु होऊन संपला आहे. असं होऊ शकतं जेव्हा एखादा संघ 7 धावांवर सर्वबाद होऊन दुसऱ्या संघाने लगेचच या धावा बनवत टार्गेट चेस केलं.

क्रिकेट जगतातील सर्वात छोटा सामना, अवघ्या 7 धावांवर संघ ऑलआउट, प्रतिस्पर्धी संघ झटपट विजयी
कसोटी सामना (प्रतिकात्मक फोटो)
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 1:00 PM
Share

लंडन : पूर्वी केवळ टेस्ट क्रिकेट खेळवलं जायचं, मग एकदिवसीय आता टी-20 सह 10 षटकांचे टी-10 क्रिकेटही खेळवलं जातं. पण आम्ही तुम्हाला असा एक सामना सांगणार आहोत जो याहूनही छोटा होता. विचार करा एखादा सामना सुरु होण्याची तुम्ही वाट पाहत असता आणि काही कामामुळे तुम्ही थोडा उशीरा सामना पाहायला घेता पण तोवर कळतं की सामना सुरु होऊन संपला आहे. असं होऊ शकतं जेव्हा एखादा संघ 7 धावांवर सर्वबाद होऊन दुसऱ्या संघाने लगेचच या धावा बनवत टार्गेट चेस केलं. हो असा सामना झाला आहे, ज्यात दोन्ही संघानी मिळून केवळ 56 चेंडूच टाकत सामना संपला. तर हा सामना होता इंग्लंडच्या (England)  यॉर्कशर प्रीमियर लीगमध्ये (Yorkshire Premier League) ईस्टरिंगटोन क्लब आणि हिलम एंड मॉन्क फ्रिस्टन क्रिकेट क्लब (Hillam Monk Fryston vs Eastrington Cricket Club) यांच्यात पार पडलेला. काही तासांतच संपलेल्या या सामना क्रिकेट इतिहासातील अत्यंत छोट्या आणि कमी वेळ चाललेल्या सामन्यांपैकी एक आहे. (In Yorkshire Premier League Hillam Monk Fryston Cricket Club All Out on 7 Runs Eastrington Cricket Club Won by 10 wicket)

सामन्यात हिलम एंड मॉन्क फ्रिस्टन क्रिकेट क्लब प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. पाहता पाहता एक-एक गडी बाद होत गेला आणि स्कोरबोर्डवर रनांच्या जागी विकेट्स जास्त पडलेल्या दिसून येत होत्या. अगदी अशाप्रकारे फलंदाज बाद होत होते की एक जायचा आणि दुसरा मागोमाग यायचा. विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी संघ ईस्टरिंगटोन क्लबला तिसऱ्या गोंलदाजाती गरजही पडली नाही. दोन गोलंदाजांनी मिळूनच हिलम एंड मॉन्क फ्रिस्टन क्रिकेट क्लबचे 10 ही फलंदाज बाद केले. संपूर्ण संघाने मिळून  8 ओव्हर खेळले आणि अवघ्या 7 धावांवर ऑलआउट झाले. ज्याती 8 फलंदाज शून्यावर बाद झाले.

विजयासाठी 7 धावांचे टार्गेट

पहिली इनिंग संपल्यानंतर ईस्टरिंगटोन क्लबला विजयासाठी 8 धावांचे टार्गेट होते. हे टार्गेट ईस्टरिंगटोनच्या सलामी फलंदाजानी अवघ्या 1.2 ओव्हरमध्ये पार करत 8 चेंडूत 8 रन करत पार केले आणि तब्बल 10 विकेट राखत विजय मिळवला. जेम्स केंद्र या एका फलंदाजाने एका चौक्यासह 7 धावा केल्या आणि एका अतिरिक्त धावेमुळे ईस्टरिंगटोन क्लब विजयी झाला.

हे ही वाचा :

तगड्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण, सलामी कसोटी सामन्यातच 10 विकेट, मग 30 वर्षाच्या वयात हत्‍या

दर्जा! अशी चिवट फलंदाजी पाहिली नसेल, 104 ओव्हरमध्ये केवळ 122 धावा, एकाच खेळाडूने खेळले 278 चेंडू

कधी अर्धशतकाहून अधिक धावा न करणाऱ्या खेळाडूने ठोकलं दुहेरी शतक, भारतीय संघावर मिळवला दमदार विजय

(In Yorkshire Premier League Hillam Monk Fryston Cricket Club All Out on 7 Runs Eastrington Cricket Club Won by 10 wicket)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.