IND Vs NZ, 3rd T20I, Highlights: तिसरी मॅच टाय, टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध सीरीज जिंकली
IND Vs NZ, 2nd T20I, LIVE: टीम इंडिया 3 टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

नेपियर: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा टी 20 सामना पावसामुळे मध्यावरच थांबवावा लागला. पावसाने या मॅचमध्ये व्यत्यय आणला. डकवर्थ लुईस नियमानुसार ही मॅच टाय झाली. टीम इंडियाने तीन टी 20 सामन्याची सीरीज 1-0 ने जिंकली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना टीम इंडियाने 65 धावांनी जिंकला होता.
आज न्यूझीलंडची टीम 160 रन्सवर ऑलआऊट झाली. भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना 9 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 75 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसरी टी 20 सीरीज जिंकली आहे. याआधी आयर्लंड विरुद्ध सीरीज जिंकली होती.
LIVE NEWS & UPDATES
-
IND vs NZ, LIVE Score: तिसरी मॅच टाय
डकवर्थ लुइस नियमानुसार तिसरी मॅच टाय झाली आहे. दुसरा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे भारताने तीन सामन्यांची न्यूझीलंड विरुद्ध सीरीज 1-0 ने जिंकली.
-
IND vs NZ, LIVE Score: सोढी काहीच करु शकला नाही, Arshdeep चा क्लासिक यॉर्कर
-
-
IND vs NZ, LIVE Score: नेपियरमध्ये मोठा पाऊस
सामना 20 मिनिटात सुरु झाला नाही, तर तिसरी मॅच रद्द होईल. नेपियरमध्ये मोठा पाऊस कोसळतोय.
-
India vs New Zealand, 3rd T20I, LIVE: टाय होऊ शकतो सामना
हा सामना सुरु झाला नाही, तर मॅच टाय होईल. DLS नुसार दोन्ही टीम्सचे स्कोअर बरोबर आहेत.
-
IND vs NZ, LIVE Score: 9 ओव्हर्सचा खेळ पूर्ण
9 ओव्हर्समध्ये भारताच्या 4 बाद 75 धावा झाल्या आहेत. पंड्या 30 आणि हुड्डा 9 रन्सवर खेळतोय. पावसाचा जोर वाढल्यानंतर पंचांनी मॅच थांबवलीय.
-
-
IND vs NZ, LIVE Score: दीपक हुड्डा मैदानात
8 ओव्हर अखेरीस भारताच्या 4 बाद 69 धावा झाल्याआहेत. दीपक हुड्डा आणि कॅप्टन हार्दिक पंड्याची जोडी मैदानात आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: न्यूझीलंडला मिळाली भारताची मोठी विकेट
न्यूझीलंडला सूर्यकुमार यादवच्या रुपाने भारताची मोठी विकेट मिळाली. ईश सोढीच्या गोलंदाजीवर त्याने फिलिप्सकडे सोपा झेल दिला. सूर्याने 10 चेंडूत 13 धावा केल्या. भारताच्या 4 बाद 62 धावा झाल्या आहेत. 7 ओव्हर अखेरीस भारताच्या 4 बाद 64 धावा झाल्या आहेत.
-
IND vs NZ, LIVE Score: पावरप्लेमध्ये भारताच्या 3 विकेट
पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये भारताच्या 3 बाद 58 धावा झाल्या आहेत. हार्दिक 23 आणि सूर्यकुमार 12 धावांवर खेळतोय.
-
IND vs NZ, LIVE Score: हार्दिक पंड्याचा गोलंदाजांवर हल्लाबोल
5 व्या ओव्हरमध्ये धावफलकावर भारताच्या 50 धावा लागल्या. हार्दिक पंड्याने दबाव न घेता उलट गोलंदाजांवर हल्लाबोल केला. भारताच्या 5 ओव्हरमध्ये 50 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 22 आणि सूर्यकुमार यादव 5 धावांवर खेळतोय
-
पोलिसांना चॅलेंज देणाऱ्याविरोधात गुन्हा
नागपूर : ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ गुंडाची व्हिडीओ व्हायरल, पोलीस वाहनातूनच इशारा देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
-
IND vs NZ, LIVE Score: हार्दिक पंड्या-सूर्यकुमारला जीवदान
एडम मिल्नेच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याला जीवदान मिळालं. 4 ओव्हर्समध्ये भारताच्या 3/36 धावा झाल्या आहेत.
-
IND vs NZ, LIVE Score: भारताला लागोपाठ दोन धक्के
भारताचे दोन्ही ओपनर्स तंबूत परतले आहेत. ऋषभ पंतने साऊदीच्या गोलंदाजीवर सोढीकडे झेल दिला. त्याने 5 चेंडूत 11 धावा केल्या. श्रेयस अय्यरही पहिल्याच चेंडूबाद बाद झाला. त्याने स्लीपमध्ये नीशॅमकडे झेल दिला. तिसऱ्या ओव्हरमध्ये भारताच्या दोन विकेट गेल्या. टीम इंडियाची 22/3 अशी स्थिती आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: भारताला पहिला धक्का
भारताच्या इनिंगला सुरुवात झाली आहे. 2 ओव्हर्समध्ये भारताच्या एक बाद 13 धावा झाल्या आहेत. इशान किशन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर चॅपमॅनकरवी झेलबाद झाला. मिल्नेने ही विकेट काढली. त्याने 10 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: न्यूझीलंड All out
20 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडची टीम 160 रन्सवर ऑलआऊट झाली. डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स मैदानावर असे पर्यंत न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. पण हे दोघ आऊट होताच न्यूझीलंडचा डाव गडगडला. दोघांनी 86 धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराज आणि अर्शदीपने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. 146 ते 149 दरम्यान न्यूझीलंडने 6 विकेट गमावल्या. दोघांनी न्यूझीलंडची वाट लावली.
-
IND vs NZ, LIVE Score: 3 रन्समध्ये 6 विकेट
19 व्या ओव्हरच्या अखेरीस न्यूझीलंडच्या 9 बाद 155 धावा झाल्या आहेत. अर्शदीपने 4 ओव्हर्समध्ये 37 धावा देऊन 4 विकेट काढल्या.
-
IND vs NZ, LIVE Score: अर्शदीपचा क्लासिक यॉर्कर
अर्शदीप सिंहने क्लासिक यॉर्करवर ईश सोढीला शुन्यावर बोल्ड केलं. 18.2 ओव्हर्समध्ये 149 धावात न्यूझीलंडच्या 8 विकेट गेल्या आहेत.
-
IND vs NZ, LIVE Score: मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी
मोहम्मद सिराजने आज भेदक गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हर्समध्ये 17 धावा देऊन 4 विकेट काढल्या. सँटनरला त्याने चहलकरवी 1 रन्सवर कॅचआऊट केलं. 18 ओव्हर अखेरीस न्यूझीलंडच्या 6 बाद 149 धावा झाल्या आहेत.
-
IND vs NZ, LIVE Score: सिराजकडून न्यूझीलंडला आणखी एक धक्का
147 धावांवर न्यूझीलंडला मोहम्मद सिराजने आणखी एक धक्का दिला. त्याने नीशॅमला शुन्यावर ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. 17.1 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या 5 बाद 147 धावा झाल्या आहेत.
-
IND vs NZ, LIVE Score: अखेर डेवॉन कॉनवे आऊट
दमदार फलंदाजी करणारा कॉनवे OUT झाला आहे. अर्शदीपच्या गोलंदाजीवर त्याने इशान किशनकडे झेल दिला. 49 चेंडूत त्याने 59 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 2 षटकार आहेत. 17 ओव्हर अखेरीस न्यूझीलंडच्या 4 बाद 147 धावा झाल्या आहेत.
-
12वी नंतरची डिग्री आता 4 वर्षांची
12वी नंतरची डिग्री आता 4 वर्षांची, बॅचलर डिग्री यापुढे 4 वर्षांची असणार, UGC ने घेतला मोठा निर्णय, देशभरात आता BA, B COM, BSC डिग्री 4 वर्षांची असणार
-
IND vs NZ, LIVE Score: अखेर सिराजने कॉनवे-फिलिप्सची जोडी फोडली
अखेर मोहम्मद सिराजने धोकादायक ठरणारी कॉनवे-फिलिप्सची जोडी फोडली. भुवनेश्वर कुमारने फिलिप्सचा अप्रतिम झेल घेतला. 33 चेंडूत त्याने 54 धावा फटकावल्या. यात 5 चौकार आणि 3 षटकार आहेत. 16 ओव्हर अखेरीस न्यूझीलंडची 135/3 स्थिती आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: भारतीय गोलंदाजांवर हल्लोबल
15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. न्यूझीलंडच्या 2 बाद 129 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स दोघांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. कॉनवे 42 चेंडूत 53 धावांवर आणि फिलिप्स 32 चेंडूत 54 धावांवर खेळतोय.
-
IND vs NZ, LIVE Score: डेवॉन कॉनवेची हाफसेंच्युरी
14 व्या ओव्हरच्या अखेरीस न्यूझीलंडच्या 2 बाद 120 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवेने अर्धशतक झळकावलं.
-
IND vs NZ, LIVE Score: चहलला धुतलं
13 वी ओव्हर टाकणाऱ्या चहलला ग्लेन फिलिप्सने धुतलं. या ओव्हरमध्ये 16 धावा निघाल्या. न्यूझीलंडच्या 105/2 धावा झाल्या आहेत.
-
IND vs NZ, LIVE Score: कॉनवे-फिलिप्सची जोडी जमली
12 ओव्हर अखेरीस न्यूझीलंडची स्थिती 89/2 आहे. कॉनवे 45 आणि फिलिप्स 22 धावांवर खेळतोय.
-
IND vs NZ, LIVE Score: 10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण
10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. न्यूझीलंडची स्थिती 74/2 आहे. कॉनवे-फिलिप्सची जोडी मैदानात आहे. चहलच्या या ओव्हरमध्ये 13 धावा निघाल्या.
-
IND vs NZ, LIVE Score: हर्षल पटेलला संधी
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आजच्या सामन्यात हर्षल पटलेला संधी दिलीय. त्याने 9 वी ओव्हर टाकली. या षटकात त्याने 6 धावा दिल्या. न्यूझीलंडची स्थिती 61/2 आहे. कॉनवे 31 आणि फिलिप्स 8 धावांवर खेळतोय.
-
IND vs NZ, LIVE Score: युजवेंद्र चहलकडून चांगली गोलंदाजी
युजवेंद्र चहलने आठवी ओव्हर टाकली. न्यूझीलंडची स्थिती 55/2 आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: दीपक हुड्डाची चांगली गोलंदाजी
दीपक हुड्डाने सातवी ओव्हर टाकली. या षटकात फक्त 3 धावा निघाल्या. 49/2 अशी स्थिती आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: पावरप्लेमध्ये न्यूझीलंडच्या दोन विकेट
पावरप्लेच्या लास्ट ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने मार्क चॅपमन रुपाने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. त्याने 12 चेंडूत 12 धावा केल्या. यात दोन चौकार होते. पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये न्यूझीलंची 46/2 स्थिती आहे. डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्सची जोडी मैदानात आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: अर्शदीपला धुतलं, ओव्हरमध्ये निघाल्या 19 धावा
चौथी ओव्हर टाकणाऱ्या अर्शदीपला डेवॉन कॉनवेने धुतलं. त्याच्या ओव्हरमध्ये 19 धावा निघाल्या. चार ओव्हरमध्ये न्यूझीलंडची स्थिती 30/1 आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: भुवनेश्वरची टिच्चून गोलंदाजी
भुवनेश्वर कुमारने तिसरी ओव्हर टाकली. त्याने फक्त 2 धावा दिल्या. डेवॉन कॉनवे आणि मार्क चॅपमॅनची जोडी मैदानात आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: अर्शदीपने न्यूझीलंडला दिला पहिला धक्का
भारत वि न्यूझीलंड तिसऱ्या टी 20 सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. न्यूझीलंडच्या 1 बाद 9 धावा झाल्या आहेत. सलामीवीर फिन एलनला अर्शदीपने पायचीत पकडलं. त्याने 3 धावा केल्या. डेवॉन कॉनवे आणि मार्क चॅपमॅनची जोडी मैदानात आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: अशी आहे भारताची प्लेइंग इलेवन
इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कॅप्टन) दीपक हुड्डा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल
-
न्यूझिलंडने टॉस जिंकला, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय
न्यूझिलंडने टॉस जिंकला, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय
न्यूझीलंडचा संभाव्य संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे , मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, इश सोधी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन.
-
IND Vs NZ, 3rd T20I, LIVE: पावसामुळे टॉसला विलंब
पावसामुळे मैदान ओलं आहे. त्यामुळे टॉसला विलंब होतोय. रिमझिम पाऊस सुरु आहे.
-
IND vs NZ, LIVE Score: भारत-न्यूझीलंडमध्ये तिसरा टी 20 सामना
भारत आणि न्यूझीलंडमध्ये नेपियर येथे तिसरा टी 20 सामना होणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.
Published On - Nov 22,2022 11:21 AM
