
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सांगता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या अंतिम सामन्याने होणार आहे. तिसऱ्या पर्वात जेतेपदासाठी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा जेतेपद , तर दक्षिण अफ्रिका पहिल्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. जेतेपदासाठी दक्षिण अफ्रिकेने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. त्यानंतर काही मिनिटातच ऑस्ट्रेलियाने आपलं अस्त्र बाहेर काढलं. प्लेइंग 11 इलेव्हन जाहीर करताना दोन खेळाडूंना संघात घेत गुंता सोडवला आहे. माजी अव्वल क्रमांकाचा कसोटी फलंदाज मार्नस लाबुशेन उस्मान ख्वाजासोबत सलामीला मैदानात उतरणार आहे. मार्नस लाबुशेनचा फॉर्म नसला तरी त्याला पॅट कमिन्स प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं आहे. तर स्कॉट बोलँड ऐवजी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या जोश हेझलवूडला संधी दिली आहे. त्याच्यासोबत संघात डावखुरा गोलंदाज मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स असणार आहे.
अष्टपैलू कॅमेरून ग्रीन पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पहिलाच कसोटी सामना खेळणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी त्याला पसंती दिली आहे. सध्या ग्रीन चांगला फॉर्मात असून काउंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर ब्यू वेबस्टरने संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. मधल्या फळीत फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी पर्यायांसह गोलंदाजांना काही आधार देईल . जोश इंग्लिस ऐवजी अॅलेक्स कॅरीने संघात स्थान पक्कं केलं आहे. जोश इंग्लिसने आयपीएलमध्ये आपला फॉर्म दाखवला होता. पण प्लेइंग 11 मध्ये त्याची जागा काही बनली नाही. आता ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवणार की दक्षिण अफ्रिकेला यश मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ प्लेइंग इलेव्हन: उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरीन, मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.