मि. इंडिया, मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनाने निधन

| Updated on: Apr 30, 2021 | 2:18 PM

मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड (Marathi bodybuilder Jagdish Lad) याचाही कोरोनाने बळी घेतला आहे.

मि. इंडिया, मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनाने निधन
Jagdish Lad
Follow us on

मुंबई : कोरोना उद्रेकात (Corona) अनेकांचे जीव जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड (Marathi bodybuilder Jagdish Lad) याचाही कोरोनाने बळी घेतला आहे. बॉडी बिल्डिंगमधील मानाचा मि. इंडिया हा किताब पटकावणारा  जगदीश लाड केवळ 34 वर्षांचा होता. जगदीशच्या जाण्याने लाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  (Mr India and Marathi Bodybuilder Jagdish Lad passed away due to Corona at age of 34 in Vadodara Gujrat )

जगदीशला काही दिवसापूर्वी कोरोना झाला होता. त्याच्यावर गुजरातमधील बडोदा इथं उपचार सुरु होते. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदशीसारख्या धष्टपुष्ट तरुणाला कोरोना हतबल करत असेल, तर जे कोणी कोरोनाला सिरियस घेत नसेल, त्यांनी आता पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

नवी मुंबईचा रहिवासी, बडोद्यात व्यायामशाळा

जगदीश लाड हा नवी मुंबईत राहात होता. त्याने मागील वर्षीच गुजरातमधील बडोदा इथं जीम सुरु केली होती. त्यामुळे तो तिकडेच असायचा. जगदीशला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगचं आकर्षण होतं. त्यामुळे पिळदार शरीरयष्टीच्या जगदीशने महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवल्या. त्याने नवी मुंबई महापौर श्रीसह मोठ मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं पटकावली होती.

मिस्टर इंडिया किताब 

जगदीशच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे त्याने मिस्टर इंडिया या मानाच्या स्पर्धेत दोनवेळा सुवर्णपदकं पटकावली होती. इतकंच नाही तर मुंबईतील वर्ल्ड चॅम्पियन्सशिपमध्ये त्याला कांस्य पदक मिळालं होतं.

दरम्यान, जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या  

देश सुन्न, लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन, कोरोनावरील उपचारादरम्यान हृदयविकाराचा धक्का