
नवी दिल्ली : आपला जोडीदार, रूममेट किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून आपली Google किंवा YouTube सर्च हिस्ट्री सिक्रेट ठेवू इच्छित असाल तर आपण त्यावर संकेतशब्द सेट करू शकता. म्हणजेच, आता आपल्याला Incognito मोड वापरण्याची आवश्यकता नाही कारण आपण पासवर्ड व्हेरिफिकेशन सेट करू शकता. प्रत्येकाला हे माहित आहे की कोणीही activity.google.com वर जाऊन तुमची गूगल अॅक्टिव्हिटी म्हणजे वेब आणि मॅप सर्च, यूट्यूब हिस्ट्री आणि गूगल असिस्टंटची संपूर्ण माहिती पाहू शकतो. याचा अर्थ असा की, या लिंकवर जाऊन कोणीही आपल्या सिस्टममधून सर्व सर्च, वॉच हिस्ट्री याबाबत माहिती घेऊ शकते. एकदा व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुणीही आपली गूगल हिस्ट्री पासवर्डशिवाय पाहू शकणार नाही. (Now your Google History will be safe, know all about this feature)
हे फिचर ऑन करण्यासाठी आपल्याला activity.google.com वर जाऊन लॉग इन करावे लागेल. यानंतर आपल्याला Manage My Activity verification लिंक वर क्लिक करावे लागेल. पॉप अप टॉगलमध्ये आपल्याला Require extra verification बटणवर क्लिक करुन सेव्ह करावे लागेल. यानंतर गूगल आपल्याला पासवर्ड विचारेल. म्हणजेच आपण आपला पासवर्ड प्रविष्ट केल्यानंतरच लॉगिन करण्यात सक्षम व्हाल. एकदा आपण हे फिचर ऑन केले की आपल्याला व्हेरिफाय बटणावर क्लिक करावे लागेल आणि पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल. जेव्हा आपल्याला सर्च हिस्ट्री जाणून घ्यायची असेल तेव्हा आपल्याला हे करावे लागेल.
कोणी आपली हिस्ट्री पाहून नये असे वाटत असेल तर मॅन्युअली किंवा ऑटोमॅटिकली आपली गूगल अॅक्टिव्हिटिज डिलिट करु शकता. जे 3 महिने, 18 महिने, 36 महिने जुने सर्च आहेत ते गूगल ऑटो डिलिट करते. यासाठी आपल्याला My Google Activity page, Web & App Activity > Auto-delete आणि सेलेक्ट किंवा प्रेफ्रेंस वर क्लिक करावे लागेल. (Now your Google History will be safe, know all about this feature)
सर्वसामान्यांना धक्का! एसी-फ्रिजच्या किमती लवकरच वाढणार, ‘एवढे’ पैसे मोजावे लागणार#AirConditioner #businessnewsinmarathi #endconsumers #refrigeratorshttps://t.co/qRUtpgXEc8
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2021
इतर बातम्या
“नव्या कायद्यानुसार माहिती द्या”, केंद्र सरकारची सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस
नागपुरात इंजेक्शनचा काळाबाजार, Tocilizumab ची किंमत एक लाख रुपये, 2 डॉक्टरसह एकाला बेड्या