AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Insurance Claim : पुरामुळे कारचे मोठे नुकसान, कार इन्शुरन्स येईल का कामी

Car Insurance Claim : देशातील उत्तर भारतच नाही तर महाराष्ट्रातील कोकण पट्टीत पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराचे संकट येऊन ठेपले आहे. पुराच्या पाण्यात अनेक कारचे नुकसान झाले. अशावेळी विमा कंपन्या भरपाई करतात का?

Car Insurance Claim : पुरामुळे कारचे मोठे नुकसान, कार इन्शुरन्स येईल का कामी
| Updated on: Jul 19, 2023 | 3:46 PM
Share

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : गेल्या पंधरा दिवसांपासून उत्तर भारताला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पुराने अनेक पर्यटनस्थळांवर अधिक्रमण केले आहे. रहिवाशी भागात पाणी शिरले. घरात पाणी शिरले. रस्ते, अंगणातील कार, बाईक या पुराच्या पाण्यात बुडालेल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाने तळ ठोकला आहे. या भागात ही जोरदार पाऊस पडत आहे. अशावेळी पुरात अडकलेल्या वाहनांसाठी विम्याची (Flood Damage Car Insurance Claim) सोय असते का? असा विमा घेतला तर नुकसान भरपाई मिळते का? या विम्यासाठी कंपन्या काही वेगळे शुल्क आकारतात का? सामान्य कार विम्यात पुराच्या पाण्याची नुकसान भरपाई मिळते का ?

सामान्य कार इन्शुरन्समध्ये आहे का सोय?

स्टँडर्ड कार इन्शुरन्समध्ये (Standard Car Insurance) नैसर्गिक आपत्तीतून (Natural Disasters) होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासंबंधीचे संरक्षण या पॉलिसीत नसते. पुराच्या पाण्यात कार अडकली तर तिच्या नुकसानीची भरपाई या सर्वसामान्य इन्शुरन्समध्ये मिळत नाही.

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय

स्टँडर्ड पॉलिसी (Standard Policy), मध्ये “थर्ड पार्टी इन्शुरन्स” (Third Part Insurance) वा “लायबिलिटी इंन्शुरन्स” (Liability Insurance) चा समावेश असतो. अपघात झाला आणि त्यात तुमची चूक असेल तर समोरील व्यक्तीला नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे पुराच्या धोक्यापासून हा विमा नुकसान भरपाई देत नाही.

कंप्रीहेंसिव्ह इन्शुरन्स (Comprehensive Insurance Policy)

कंप्रीहेंसिव्ह कार इंन्शुरन्स (Comprehensive Car Insurance) एक पर्यायी संरक्षण आहे. यामध्ये वाहनाची चोरी, तोडफोड, आग, पूर, वादळ, गारीचा मारा अशा नैसर्गिक संकटात कारचे नुकसान झाले तर संरक्षण मिळते. पुराच्या पाण्यात कार अडकली, डुबली तर कंप्रीहेंसिव्ह इन्शुरन्स कव्हेरजमुळे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळते.

विम्याचा फायदा काय

नैसर्गिक आपत्तीत संरक्षण

कंप्रीहेंसिव्ह विम्यामुळे पुराच्या पाण्यासह नैसर्गिक आपत्तीत कारचे नुकसान झाले तर भरपाई मिळते. कार पुरात अडकली. पाण्यामुळे खराब झाली तर रिपेअरिंग, दुरुस्तीसाठीची रक्कम विमा कंपन्या देतात.

चोरी झाल्यास भरपाई

कंप्रीहेंसिव्ह विम्यात नैसर्गिक आपत्तीत संरक्षण तर मिळतेच. पण कार चोरीमध्ये पण या विम्याची मोठी मदत मिळते. चोरी झालेली कार परत न मिळाल्यास तिच्या सध्याच्या बाजारातील मूल्याआधारीत रक्कम परत मिळते.

वाहनाचे नुकसान झाल्यास

नैसर्गिक आपत्तीसह वाहनावर एखादे झाड पडल्यास, भूकंपामुळे नुकसान, जंगलातील अगामुळे नुकसान झाले तर या विमा पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते.

ग्लास कव्हरेज

कंप्रीहेंसिव्ह विम्यात गाडीच्या काचेच्या संरक्षणाची हमी देण्यात येते. जर आपत्तीत तुमच्या कारचे वींडशिल्ड अथवा खिडक्यांचे नुकसान झाले तर दुरुस्तीचा खर्च मिळतो.

मनाला दिलासा

कंप्रीहेंसिव्ह इन्शुरन्स असल्याने मनाला मोठा दिलासा मिळतो. कारण अनेक गोष्टीचे नुकसान झाले तर आर्थिक मदत मिळते. त्यामुळे विमाधारकाला नैसर्गिक आपत्तीत दिलासा मिळतो.

कायदेशीर गरज

थर्ड पार्टी इन्शुरन्स सारखा कंप्रीहेंसिव्ह विमा आवश्यक नाही. हा विमा पर्यायी आहे. कार कंपन्या साधारणपणे वाहनधारकांना कंप्रीहेंसिव्ह विमा घेण्यासाठी आग्रह करतात.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.