AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Investment : गुंतवणूक करा की सोन्यावानी! निवडा हे पर्याय, मिळवा तगडा रिर्टन

Gold Investment : सोन्यातील गुंतवणूक सध्या सर्वात फायदेशीर ठरत आहे. सोन्याने पुन्हा दरवाढीचा गिअर टाकला आहे. ज्यांनी योग्यवेळी गुंतवणूक केली ते आज कोणत्याही जोखिमेशिवाय मालदार झाले आहेत.

Gold Investment : गुंतवणूक करा की सोन्यावानी! निवडा हे पर्याय, मिळवा तगडा रिर्टन
| Updated on: Mar 29, 2023 | 7:21 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय अजूनही सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर आणि सुरक्षित (Investment In Gold) मानतात. सोन्यात गुंतवणुकीचा केवळ एकच पर्याय उपलब्ध नाही. लवकरच देशात सोन्यासाठी एकच भाव असेल. भारतात बुलियन एक्स्चेंजची (Bullion Exchange) सुरुवात झाली आहे. भारतीयांचे सुवर्णवेड जगप्रसिद्ध आहे. चीन नंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने आयातदार आहे. किमतींतील अस्थिरता पाहता बाजारातील तज्ज्ञ आता सोन्यात हळूहळू आणि विविध पर्यायांसह गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. तर सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित तर आहेच, पण त्यात फायदाही भरपूर मिळतो. शिवाय कर्ज मिळविता येते. त्यासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागत नाही. कमी व्याजदरावर हे कर्ज उपलब्ध असते. त्यावरील प्रक्रिया शुल्कही कमी असते.

सोन्याची मोठी झेप

जर गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली तर सोन्याची लांब उडी लक्षात येईल. सोने 31 हजार रुपयांहून 60 हजार रुपयांवर पोहचल्याचे दिसून येईल. सोन्याने गेल्या पाच वर्षांत दुप्पट कमाई करुन दिली आहे. आता 1 एप्रिलपासून हॉलमार्किंग सोने विक्री आणि खरेदी अनिवार्य करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सोन्यावर  6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्क कोड लिहिलेला असेल. यामुळे सोन्याची (Gold) शुद्धता समोर येईल.

1- गोल्ड ईटीएफ

तुम्ही शेअर खरेदी करता, तसे सोने खरेदी करु शकाल, या सुविधेला Gold ETF असे म्हणतात. हा एक्सचेंज-ट्रेडेड फंड असतो. हा स्टॉक एक्सचेंजवर खरेदी आणि विक्री करता येतो. सोन्याच्या सध्याच्या किंमतीच्या जवळपास गोल्ड ईटीएफ खरेदी करता येते. गोल्ड ईटीएफचे बेंचमार्क स्पॉट भाव आहे. पण यासाठी तुमच्याकडे ट्रेंडिंग डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही गोल्ड ईटीएफ खरेदी करु शकता.

2- फिजिकल गोल्ड

तुम्ही थेट सराफा बाजारात जाऊन सोने खरेदी करु शकता. दागिने, सोन्याची नाणी, बिस्किट आणि वीट यामध्ये गुंतवणूक करु शकता. तज्ज्ञांच्या मते, सोन्याची आभुषणे, दागिने खरेदी करणे हा योग्य पर्याय नाही. कारण त्यासाठी मेकिंग चार्ज आणि जीएसटी द्यावा लागतो. तसेच मोडीवेळी तुम्हाला भाव पण जास्त मिळत नाही.

3- डिजिटल सोने

डिजिटल गोल्ड हे सॉलिड गोल्ड आणि पेपर गोल्ड यांचे मिश्रण आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्स डिजिटल सोन्याचा पर्याय देत आहेत. ज्यांना सोन्यात 100 रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी डिजिटल गोल्ड हा योग्य पर्याय आहे. यामध्ये ग्राहकांना आवडीनुसार खरेदी-विक्री करण्याची सोय आहे. डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला सोने खरेदी-विक्रीची सुविधा मिळते. गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून हे सोने खरेदी करता येते.

4- सॉवरेन गोल्ड बाँड

सॉवरेन गोल्ड बाँड हा पण एक चांगला पर्याय आहे. हा सरकारी बाँड असतो. केंद्र सरकार वेळोवेळी हा बाँड बाजारात घेऊन येते. एक ग्रॅम सोन्याची जेवढी किंमत असते, तेवढीच या बाँडची किंमत असते. सार्वभौम सुवर्ण रोख्यावर दरवर्षी 2.50% निश्चित व्याज मिळते. पण त्यासाठी डी-मॅट खात्याची गरज आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप्पं आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.