माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद अन् आमदारकी जाणार? कोर्टानं सुनावली 2 वर्ष जेलची शिक्षा, पण का?

माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद अन् आमदारकी जाणार? कोर्टानं सुनावली 2 वर्ष जेलची शिक्षा, पण का?

| Updated on: Feb 21, 2025 | 11:08 AM

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाच्या जेलची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मंत्रीपद, आमदारकी जाणार?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनाही दोन वर्षांची शिक्षा आणि 20 हजारांचा दंड सुनावण्यात आला. कागदपत्रांमध्ये फेरफार करून म्हाडच्या योजनेतील मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घर मिळवल्याचा आरोप जिल्हा कोर्टात सिद्ध झाला. शिक्षा सुनाविल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. तसचं सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी महिनाभराच्या कालावधीची मुभा देण्यात आली आहे.

प्रकरण नेमकं काय?

1995 मध्ये महाडच्या स्कीममध्ये मुख्यमंत्री 10% कोटा योजनेतून घर मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा ठपका कोकाटेंवर आहे. स्वतःचं घर नसल्याचं आणि उत्पन्न कमी असल्याचं सांगून दोन घरं त्यांनी पदरात पाडून घेतली आहेत. इतर लाभार्थ्यांना मिळालेली दोन घरं सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतली. शिवाय घरं नावावर झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचा सुद्धा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे बंधूंसह चौघांविरोधात तक्रार दिली होती. तर 1997 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे बंधूंसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 27 वर्ष नाशिकच्या जिल्हा न्यायालयात 10 साक्षीदार तपासण्यात आले अखेर कोर्टात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोषी ठरवण्यात आलं. माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनाही प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड सुनावण्यात आला. तसेच महाडचे हे फ्लॅट्स परत करण्याचे ही आदेश देण्यात आले.

Published on: Feb 21, 2025 11:08 AM