धक्कादायक! कराडमध्ये एआयच्या मदतीने महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ बनवले
कराडमध्ये एआयच्या मदतीने महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवले गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
एआयच्या मदतीने कराडमध्ये महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कराड शहरातील दोन नामांकित महिला डॉक्टरांचे एआयच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ बनवले गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे व्हिडीओ परराज्यातून तयार करण्यात आले असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या प्रकारामुळे वैद्यकीय वर्तुळासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
साताऱ्यातील कराड शहरातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि एका तरुण-तरुणीचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले आहेत. हे व्हिडीओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. हे व्हिडीओ समोर येताच या डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Published on: Jun 11, 2025 05:01 PM
