Vijay Wadettiwar : ‘…तर अर्ध्या आमदारांचं लग्न हिरोईन सोबत’, मुनगंटीवाराच्या वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत…’
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले आहे. बघा काय म्हणाले?
लग्न लावून देण्याचं कामं जर आमदारांच्या हातात असतं तर अर्ध्या आमदारांचं लग्न हिरोईन सोबत झालं असतं, असं मिश्कील वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. तर आज कालचे आमदार हे हिरो सारखे वागू लागलेत, असं म्हणत काँग्रसे नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार करत सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मिश्किल फटकेबाजीवर प्रत्युत्तर दिलंय. इतकंच नाहीतर सुधीर मुनगंटीवार यांच्या डोक्यातली हिरोईन कोण हे मला माहिती नाही, असा खोचक टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
‘नवीन तरूण पिढी ही हिरोच आहेच आता… फक्त ते दिसण्यातून नसावं तर कामातून असावं…त्यांच्या कार्यातून, कृतीतून, समाजसेवेतून त्यांची कृती लोकांच्या कल्याणासाठी असेल तर त्यांना नक्की हिरोईन मिळेल पण त्याच्या डोक्यातील कोण हे आम्हाला माहिती नाही’, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, तरूण आमदारांच्या डोक्यातील जी काही हिरोईन असेल त्या आमदाररूपी काम करणाऱ्या हिरोला त्याच्या कामाला भाळून जर ती हिरोईन होत असेल तर शुभेच्छा आहे.
