Ajit Pawar : अरे मी काय पैसे खिशात घेऊन बसतो का? निधीवरून टीका करणाऱ्यांवर दादा भडकले
'सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला. अजित पवारांनी बजेट वळवलं. नरहरी झिरवळ यांना विचारा. इतरांना विचारा. या वेळी ७ लाख २० कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करताना ४१ टक्के गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आदिवासी विभागाल वाढवून दिला. हे पुढे येतच नाही. कोणी तरी सांगतं अजित पवारांनी अन्याय केला. कार्यकर्ता हे ऐकून खचतो. त्याला माहीत नसतं.'
अजित पवार निधी देत नाहीत, असं काहीजण म्हणतात. पण मी पैसे खिशात घेऊन बसतो का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे हे वक्तव्य केले आहे. ‘राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिल्या तिमाहीत २० टक्के पैसे सोडतो दुसऱ्या तिमाहीत ४० टक्के तिसऱ्या तिमाहीत ६० टक्के नंतर ८० टक्के आणि शेवटी १०० टक्के पैसे सोडतो असं ते नियोजन असतं’, असं अजित पवार म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, ‘मागासलेला समाज आहे. त्यांना निधी द्यायचं ठरवलं तर संख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो. आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो. त्याचं सूत्र आपण सर्वांनी स्वीकारलं आहे. काही लोक जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून बदनामी करत आहेत. ‘, असं अजित पवार म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

