Deenanath Mangeshkar Hospital : आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, ‘दीनानाथ’ रूग्णालयावर ठपका

Deenanath Mangeshkar Hospital : आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, ‘दीनानाथ’ रूग्णालयावर ठपका

| Updated on: Apr 11, 2025 | 2:21 PM

पुण्यातील गर्भवती मृत्यूप्रकरणावरून आणखी एक अहवाल आलेला आहे. सहधर्मादाय आयुक्तांच्या अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. नेमकं अहवालामध्ये काय आहे?

ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूप्रकरणावरून सहधर्मादाय आयुक्तांनी अहवाल सादर केला. ज्यात पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार ठरवण्यात आलं. नियमावलीचं पालन हॉस्पिटलकडून होत नसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला. गरीब रुग्णांसाठी 30 कोटी रुपयांचा निधी रुग्णालयाने वापरला नसल्याचंही चौकशीत समोर आले. दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर रुग्णालयावरून संताप व्यक्त केला. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी आहे, गरिबाचं शोषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तर भिसे कुटुंबानं मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर यांच्या विरोधात अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ईश्वरी भिसे यांची गोपनीय माहिती मंगेशकर रुग्णालयानं आपल्या अहवालातून सार्वजनिक केली त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची मागणी भिसे कुटुंबानं केली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिलेली पाच लाखांची मदत आणि चंद्रकांत पाटील यांची एक लाखांची मदत भिसे कुटुंबानं नाकारली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 11, 2025 02:21 PM