Jayant Patil : गोगवलेंचे ठाकरे गटावर आरोप, जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
Jayant Patil On Bharat Gogawle : भारत गोगवले यांनी ठाकरे सेनेच्या कारभारावर केलेल्या विधानावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगवले यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर केलेल्या विधानानंतर आता त्यावर रकजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देखील भारत गोगवले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब होते त्यावेळी चित्र वेगळं होतं. ते गेल्यानंतर सगळं चित्र बदललं. रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप हे शिंदेंच्या बंडाचं मोठं कारण होतं आहे. असं गोगवले यांनी म्हंटलं आहे. त्यावर आता जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे की, मला वाटतं नाही असं काही असेल. परिस्थिती मला माहिती नाही. पण ठाकरे कुटुंबाला आम्ही खूप जवळून पहिलं आहे. त्यामुळे गोगवले म्हणतात तसा काही प्रकार असेल असं मला तरी वाटत नाही, असं जयंत पाटील यांनी यावर प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटलं आहे.
