Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला….; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल

Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला….; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल

| Updated on: Sep 27, 2026 | 4:09 PM

ज्योती वाघमारे यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर फेक नॅरेटिव्ह पसरवून देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवरील संशयामुळे राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ परिस्थिती आणि विरोधकांच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केले.

भाजप नेत्या ज्योती वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. राहुल गांधींचे वागणे उथळ पाण्याला खळखळाट फार असे असून, उमर पचपन की और दिल बचपन का अशा पद्धतीचे असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेने नाकारल्याने आलेल्या फ्रस्ट्रेशनमधून राहुल गांधी संवैधानिक संस्थांवर अविश्वास व्यक्त करत असल्याचे वाघमारे म्हणाल्या.

निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि ईव्हीएम मशीनबद्दल सातत्याने संशय व्यक्त करणे हे फेक नॅरेटिव्ह पसरवण्यासारखे आहे. अलीकडेच निवडणूक आयुक्तांनी संयुक्त निवेदन जारी करून विरोधकांचे दावे खोडून काढले. राहुल गांधींनी देशाची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी ज्योती वाघमारे यांनी केली.

याव्यतिरिक्त, त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि सरकारकडून सुरू असलेल्या मदतकार्याबद्दलही माहिती दिली. जनतेने इंडिया आघाडीला यापूर्वीही त्यांची जागा दाखवून दिली आहे आणि भविष्यातही देतील, असेही वाघमारे यांनी सांगितले.

 

 

Published on: Sep 27, 2026 4:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us