Pravin Darekar | मावळ गोळीबाराला जालियनवाला बाग म्हणणं शरद पवार विसरले

| Updated on: Oct 11, 2021 | 7:54 PM

प्रवीण दरेकर यांनी आज मावळमध्ये जात मावळ गोळीबारात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी दरेकर यांनी मावळ गोळीबाराची आठवण करुन देत त्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करायला पवार विसरले असतील, असा खोचक टोला दरेकर यांनी लगावलाय. ज्यावेळी महाराष्ट्रात गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झालं त्यावेळेस कुठं होतं सरकार? तेव्हा का नाही केलात बंद? असे सवाल दरेकरांनी विचारले आहेत.

Follow us on

लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते आज रस्त्यावर उतरले होते. राज्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. हाच धागा पकडत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर पलटवार केलाय.

प्रवीण दरेकर यांनी आज मावळमध्ये जात मावळ गोळीबारात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी दरेकर यांनी मावळ गोळीबाराची आठवण करुन देत त्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करायला पवार विसरले असतील, असा खोचक टोला दरेकर यांनी लगावलाय. ज्यावेळी महाराष्ट्रात गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झालं त्यावेळेस कुठं होतं सरकार? तेव्हा का नाही केलात बंद? हा केवळ चौकश्यांवरुन महाराष्ट्राचे लक्ष विचलित करण्याचा नियोजित कार्यक्रम आहे, अशा शब्दात दरेकरांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

काय आहे मावळ गोळीबार प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये 9 ऑगस्ट 2011 रोजी आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाईपलाईनला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. त्यावेळी मोठी दगडफेकही झाली होती. आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात एका महिलेसह 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर 14 आंदोलक जखमी झाले होते. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार सत्तेत होतं.