Toll Tax Rate Hike Video : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून प्रवास करताय? 1 एप्रिलपासून टोल महागणार, एकेरी प्रवासाला ‘इतक्या’ रूपयांची वाढ
राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भातील निर्णयाला मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच मंजूरी दिली होती. आता या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून प्रवास तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून तुमचा प्रवास खर्चिक होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल १ एप्रिलपासून महागणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील टोल तीन टक्क्यांनी महाग होणार आहे. तर चारचाकी वाहनाकरता एकेरी प्रवासाच्या टोलमध्ये पाच रूपयांची वाढ होणार आहे. दरम्यान, फास्ट टॅग सक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व टोलनाक्यांवर एक एप्रिलपासून प्रत्येक वाहन धारकांना फास्टटॅग अनिवार्य असणार आहे. मात्र जर तुमच्या वाहनाला फास्टटॅग नसेल तर वाहन धारकांना टोलचे दुप्पट पैसे भरावे लागणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर १ एप्रिल २०२५ नंतर फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे जर आता तुमच्या वाहनाला फास्टटॅग नसेल तर वाहन धारकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्यापूर्वी फास्टटॅग खरेदी करून त्याचा वापर करावा लागणार आहे अन्यथा टोलची दुप्पट रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'

पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?

'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?

पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
