Pawar Family : आधी लगीन कोंढाण्याचं! पवारांच्या एकत्र येण्यावर सुळेंचा लेख अन् चर्चांना उधाण
Pawar Family Dispute : शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच याच संदर्भात सुप्रिया सुळेंनी लिहिलेला लेख सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
काका-पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. मात्र यावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अजित पवारांच्या सोबत जाण्याच्या मुद्द्यावर आम्ही सर्व बोलून निर्णय घेऊ, अशा आशयाचा सुप्रिया सुळे यांचा एक लेख मासिकात छापून आला आहे. तर दुसरीकडे काही जणांना खूप घाई झाली आहे, असं वक्तव्य निलेश लंके यांनी केलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच निलेश लंके यांनी मोठं विधान केलं आहे. काहींना खूप घाई झाली आहे असं निलेश लंके यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे लंके यांचा रोख पक्षातल्या कोणकोणत्या नेत्यांकडे आहे, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. ‘अरे धीर धरा! काहींना खूप घाई झाली आहे. आहे ना आपला नेता. आपलं वय नाही तेवढा नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातळे सगळे गणितं जुळतात. आपण हाफ पॅन्ट घालून फिरत होतो तेव्हा आपला नेता राज्याचं नाही तर देशाचं राजकारण करत होता’, अशा शब्दात लंके यांनी कोणाला टोला लागवला असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
