ओबीसींना भाजपवाले दूधखुळ बाळ समजतात : विजय वडेट्टीवार
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिला आहे.
मुंबई : ओबीसी समाजाचा अपमान केला. राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीसाठी संपुर्ण देशात भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात देखिल ठिक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. तर राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिला.
त्यानंतर काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. वडेट्टीवार यांनी भाजपवाले ओबीसींना दूधखुळ बाळ समजतात. राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर आता तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे आता भाजपकडून हे ओबीसीचं नव कार्ड खेळलं जात आहे.
निरव आणि ललित मोदींना चोर म्हणणं हा काही अपमान आहे का? मग आता आपण काय निरव आणि ललित मोदी सारख्या लोकांची पूजा करायची का त्यांना ओबीसी चे नेते म्हणायचं का? हे भाजपने ठरवावे असा टोला ही त्यांनी लगावला आहे.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

