Rekha Gupta Video : दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री विराजमान, आज शपथविधी, कोण आहेत नव्या CM रेखा गुप्ता?

Rekha Gupta Video : दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री विराजमान, आज शपथविधी, कोण आहेत नव्या CM रेखा गुप्ता?

| Updated on: Feb 20, 2025 | 12:28 PM

रेखा गुप्ता देशाच्या १८ व्या महिला मुख्यमंत्री बनणार असून दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री म्हणून त्या विराजमान होणार आहेत. रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथ विधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील हजर राहणार

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा मान रेखा गुप्ता यांना मिळाला असून आज त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. हा शपथविधी सोहळा रामलीला मैदान येथे दुपारी होणार आहे. रेखा गुप्ता देशाच्या १८ व्या महिला मुख्यमंत्री बनणार असून दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री म्हणून त्या विराजमान होणार आहेत. रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथ विधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील हजर राहणार असल्याची माहिती मिळतेय. तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले आहेत. रेखा गुप्ता या हरियाणातील जिंदच्या रहिवासी आहेत. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत शालिमार बाग मतदारसंघातून २९ हजार ५९५ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. शालेय जीवनापासून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि भाजपशी जोडल्या गेल्यात. १९९४-१९९५ साली त्यांची दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी नियुक्ती झाली. १९९५-१९९७ साली दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या त्या सचिव होत्या. २००३-०४ साली भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिवपदी होत्या. एप्रिल २००७ साली उत्तरी पीतमपुरा प्रभागातून भाजपच्या नगरसेविका राहिल्यात.

Published on: Feb 20, 2025 12:28 PM