Special Report | शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन हटवलं, शिंदे गटाकडून हक्कभंग आणण्याची तयारी? पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jul 02, 2022 | 10:42 PM

एकनाथ शिंदे सरकारची पहिलीच परीक्षा ठरणारे पहिले विशेष अधिवेशन दोन दिवस मुंबईत पार पडणार आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारसमोर मोठी आव्हानं असणार आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड प्राधान्यानं आणि आधी करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाकडून हक्कभंग आणण्याची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. पाहा स्पेशल रिपोर्ट

Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारची पहिलीच परीक्षा ठरणारे पहिले विशेष अधिवेशन दोन दिवस मुंबईत पार पडणार आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारसमोर मोठी आव्हानं असणार आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची (Assembly Speaker) निवड प्राधान्यानं आणि आधी करण्यात येणार आहे. आता या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन व्हीप लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर शिंदे गटाकडून हक्कभंग आणण्याची तयारी सुरू असल्याची देखील माहिती आहे. आधी व्हिप बद्दल बोलूया. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून प्रतोद असलेल्या सुनील शिंदे यांनी एक व्हीप काढून, शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आघाडीचे महाविकास उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप काढण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून प्रतोद भारत गोगावले हेही शिंदे-फडणवीस सरकारचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करावे, असा व्हीप जारी करण्याची शक्यताय. आता या दोन्ही शिवसेनेच्या वादात कायदेशीरदृष्ट्या व्हीप नेमका कुणाचा लागू होँणार, हा वाद पेटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून हक्कभंगाची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. नेमकं काय चाललंय, पाहा याविषयीचा स्पेशल रिपोर्ट….