FREE Bumper Offer : ज्याचं नाव ‘इम्तियाज’ त्याच्यासाठीचं बंपर ऑफर; लाडक्या बहिणींचीही चांदी…माजी खासदाराची वाढदिवसाला अनोखी भेट

FREE Bumper Offer : ज्याचं नाव ‘इम्तियाज’ त्याच्यासाठीचं बंपर ऑफर; लाडक्या बहिणींचीही चांदी…माजी खासदाराची वाढदिवसाला अनोखी भेट

| Updated on: Aug 09, 2025 | 1:51 PM

इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम. ज्या व्यक्तीचे नाव इम्तियाज त्यांना 500 रुपयांचे मोफत पेट्रोल...सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांचा अनोखा उपक्रम

एमआय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरात एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्या व्यक्तीचे नाव इम्तियाज असले त्या व्यक्तीना तब्बल 500 रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आज रक्षाबंधन आणि राखी पौर्णिमेनिमित्त 50 लाडक्या बहिणींना देखील 500 रुपयांचे पेट्रोल फ्री देण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली.

राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त काही ठिकाणी बऱ्याचदा वायफळ खर्च केला जात असल्याचे पाहायला मिळते मात्र सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम आज सोलापूरात आयोजित केला आहे. वाढदिवसानिमित्त लाखोंच्या जाहिरातीत देण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांसाठी तो देण्याचा आमचा हा उपक्रम असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात येतंय. या ऑफरनंतर पेट्रोल घेण्यासाठी पंपावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Aug 09, 2025 01:51 PM