वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
Walmik Karad News : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य सूत्रधार समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडच्या वकिलाने कोर्टात आरोप मुक्तीसाठी अर्ज दाखल केलेल्या आहे.
वाल्मिक कराडच्या वकिलाकडून कोर्टात आरोप मुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर लावलेले आरोप मान्य नसल्याचं कराडच्या वकिलांनी म्हंटलं आहे.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड म्हणून अटक करण्यात आलेली आहे. धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्ती समजला जाणारा वाल्मिक कराड याने खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा कट रचल्याचं तपासातून पुढे आलं आहे. त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आलेला आहे. त्यानंतर आता वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांच्याकडून कराडची आरोपातून मुक्तता केली जावी यासाठी न्यायालयात अर्ज सादर करण्यात आलेला आहे. आम्हाला हे आरोप मान्य नसल्याचं कराडच्या वकिलांनी म्हंटलं आहे.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

