Air India Plane Crash : क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल… कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डीजीपी यांच्याशी बोलणे केले आहे. त्यांनी विमान अपघाताची प्राथमिक माहिती घेतली. अमित शहा यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. एनएसजी टीम घटनास्थळी आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील विमानात होते.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी एक मोठा विमान अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याचे वृत्त आहे. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. यादरम्यान हा मोठा अपघात घडला. अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या १ मिनिटातच विमान कोसळले. आकाशात सुमारे ६२५ फूट उंचीवर पोहोचताच विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. एअर इंडियाच्या B787 ड्रीमलायनर विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्यासह विमानाचे नेतृत्व करत होते. या अपघाताचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे व्हिडीओ बघून क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल…कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली
