AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Result : मित्रांना जास्त गुण, मला मात्र.. 75 टक्के मिळवूनही 10 वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

ग हा नुकताच 10वी उत्तीर्ण झाला. त्याने चिंचवडमधील माटे शाळेतून दहावीची परिक्षा दिली होती. मंगळवारी रिझल्ट लागल्यावर उमंगला 75 टक्के मिळाले. पण त्याच्या इतर मित्रांना मात्र त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले.

SSC Result : मित्रांना जास्त गुण, मला मात्र.. 75 टक्के मिळवूनही 10 वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
| Updated on: May 16, 2025 | 11:36 AM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीचा निकाल नुकताच लागला. राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते, मंगळवार ( 13 मे) निकाल जाहीर झाला. राज्यातील एकूण निकाल 94 टक्क्यांच्या आसपास लागला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी 100 टक्केही मिळवत घवघवीत यश संपादन केलं.

मात्र याच निकालामुळे नैराश्य येऊन 10 वी पास झालेल्य एका अल्पवयीन मुलाने टोकाचं पाऊल उचललं. 10 वीच्या परीक्षेत मित्रांना चांगले मार्क मिळाले, पण त्यांच्या तुलनेत मला मात्र कमी मार्क मिळाले, याच नैराश्यातून पिंपरी-चिंचवड येथे एका मुलाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. उमंग रमेश लोंढे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या या आत्मघाती कृतीमुळे आई-वडिलांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आई-वडील बाहेर पडले आणि त्याने संपवलं जीवन

मिळालेल्या माहितीनुसार, उमंग हा नुकताच 10वी उत्तीर्ण झाला. त्याने चिंचवडमधील माटे शाळेतून दहावीची परिक्षा दिली होती. मंगळवारी रिझल्ट लागल्यावर उमंगला 75 टक्के मिळाले. पण त्याच्या इतर मित्रांना मात्र त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले. उमंग याच्‍या इतर मित्रांना 80 ते 90 टक्‍के गुण मिळाले. मात्र त्याला 75 टक्‍के गुण मिळाले होते, पण याच गोष्टीमुळे त्याला नैराश्‍य आलं होतं.यामुळेच तो खूप निराश होता.

गुरूवारी (काल) सकाळी उमंगची आई ऑफीससाठी निघाली. तिला सोडण्यासाठी त्याचे बाबाही गेले होते. तेव्हाच त्याने टोकाचं पाऊल उचललं. ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन राहत्या घरात त्याने आयुष्य संपवलं. पत्नीला ऑफीसला सोडून उमंगचे बाबा घरी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आपल्या मुलाने गळफास घेतल्याते पाहून त्याच्या वडीलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी उमंगला घेऊन त्वरीत वायसीएम रुग्‍णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.