AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न ठरलं, मुलीचं बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलणं खटकलं, होणाऱ्या पतीने तिच्या प्रियकराचा जीवच घेतला

राजस्थानच्या जोधपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे (Youth killed his bride boyfriend in Jodhpur)

लग्न ठरलं, मुलीचं बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलणं खटकलं, होणाऱ्या पतीने तिच्या प्रियकराचा जीवच घेतला
सूनेसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बापाने केली मुलाची हत्या
| Updated on: May 05, 2021 | 3:13 PM
Share

जयपूर : राजस्थानच्या जोधपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाचं काही दिवसांपूर्वी लग्न ठरलं. मात्र, त्याचं ज्या मुलीसोबत लग्न ठरलं तिचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होतं. तिच्या प्रेम संबंधाची माहिती आरोपीला मिळाली. त्यानंतर आरोपीने संतापात मुलीच्या प्रियकराची निघृणपणे हत्या केली. या हत्येनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे (Youth killed his bride boyfriend in Jodhpur).

नेमकं काय घडलं?

जोधपूरच्या चौपासनी पोलीस ठाणे हद्दीत संबंधित घटना घडली. आरोपी टहला भीलचं नुकतंच एका मुलीसोबत लग्न ठरलं. मात्र, त्या तरुणीचे नरेश भील या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ते दोघं एकमेकांशी फोनवर बोलायचे. याच गोष्टीची माहिती टहला भील याला मिळाली. टहला याने सुरुवातीला नरेश याला बऱ्याचदा समजवण्याचा प्रयत्न केला. ज्या मुलीवर नरेशचं प्रेम आहे तिच्याशी आपलं लग्न ठरलंय. त्यामुळे नरेशने आता तिचा नाद सोडावा, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, असा दमही टहलाने दिला होता.

आधी वाद, हाणामारी नंतर हत्या

दोन-चार वेळा प्रेमात समजावून सांगून, नंतर दम देऊनही नरेश हा मुलीसोबत फोनवर बोलायचा. याच गोष्टीचा टहला याला प्रचंड राग आला. याच मुद्द्यावरुन नरेश आणि टहला यांच्यात शनिवारी (4 मे) प्रचंड वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की दोघांच्या तोंडातून शिवगाळ सुरु झाली. त्यानंतर दोघांनी हाणामारी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी लोकांनी मध्यस्थी करत दोघांना अडवलं. मात्र, टहलाने नरेशचा काटा काढण्याचा जणू काही निश्चियच केला होता.

क्लिनीकमध्ये घुसून हत्या

टहलला मंगळवारी दुपारनंतर नरेश हा चौपासनी हाऊसिंग बोर्डाच्या 18 सेक्टर येथील एका क्लिनीकमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तो देखील तिथे दाखल झाला. त्याने क्लिनीकमध्ये घुसून नरेशला लोखंडी सळीने निघृणपणे मारहाण केली. या मारहाणीत नरेशचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

क्लिनीकच्या मालकाने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीसही लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी घटनेला गांभीर्याने घेऊन तपास सुरु केला. घटनेच्या अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपी टहला भीलला अटक केली (Youth killed his bride boyfriend in Jodhpur).

हेही वाचा : ऑक्सिजन बेडअभावी आईने प्राण सोडले, सॅनिटायझर पिऊन लेकीची आत्महत्या

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.