
Bigg Boss 19 : टीव्ही विश्वातील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 19’ ला लवकरच त्याचा विजेता मिळणार आहे. बिग बॉस फिनालेला आता फक्त 2 दिवस शिल्लक राहिले आहेत… ज्यामध्ये प्रणित मोरे, गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे… या पाच स्पर्धकांपैकी एक जण ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहे.. अशात ‘बिग बॉस 19’ च्या चमकदार ट्रॉफीची पहिली झलक समोर आली आहे.
नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये ‘बिग बॉस 19’ च्या सदस्यांना ट्रॉफीची एक झलक दाखवण्यात आली आहे. ही ट्रॉफी नेहमीपेक्षा जरा वेगळी आहे… या ट्रॉफीवर हुबेहूब सलमान खान याच्यासारखी पोज आहे… सध्या ट्रॉफीचा फोटो सोशल मीडियाववर तुफान व्हायरल होत आहे.
पाचही स्पर्धक शेवटच्या वेळी असेंब्ली रूममध्ये होते. याच रूममध्ये बिग बॉसने त्यांना मिळणारी ट्रॉफी जाहीर केली. हात जोडून धरलेल्या चमकणाऱ्या बिग बॉस ट्रॉफीची पहिली झलक पाहून घरातील सदस्य आनंदाने उड्या मारू लागले.
आपला आवडता स्पर्धक विजेता व्हावा असं प्रत्येकाला वाटतं… अशात विजेता म्हणून सलमान खान कोणाचं नाव घोषित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉसने पाचही स्पर्धकांना विचारलं की, तुमच्या मते विजेता कोण होणाल यावर अमाल याने सर्वात आधी प्रणित याचं नाव घेतलं. त्यानंतर प्रणित याने गौरव याचं नाव घेतलं… फरहाना हिने तान्या मित्तल हिचंन नाव घेतलं. तर गौरव याने प्रणित याचं नाव घेतलं… तान्य हिने अमाल याचं नाव घेतलं…
नुकताच झालेल्या मुलाखतीत मालती चाहर हिला कमी वोट मिळाल्यामुळे घराबाहेर जावं लागलं… ज्यामुळे गौरव खन्ना, अमाल मलिक, तान्या मित्तल, फरहाना आणि प्रणित मोरे टॉप 5 फायनलिस्टमध्ये सामिल होतात… मालती घरातून निघून जाताना, प्रणित आणि अमालवर खूप रागावलेली दिसत होती. तिने त्या दोघांकडे दुर्लक्ष देखील केलं.