खूप श्रीमंत आहेत का? जेव्हा रेखा यांच्या पतीला पाहून हेमा मालिनी यांनी विचारला होता प्रश्न

अभिनेत्री रेखा या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. रेखा यांनी 1990 मध्ये व्यावसायिक मुकेश अग्रवालशी लग्न केलं होतं. लग्नानंतर जेव्हा हेमा मालिनी या रेखा यांच्या भेटीला गेल्या, तेव्हा त्यांनी अजबच प्रश्न विचारला होता.

खूप श्रीमंत आहेत का? जेव्हा रेखा यांच्या पतीला पाहून हेमा मालिनी यांनी विचारला होता प्रश्न
रेखा, मुकेश अग्रवाल, हेमा मालिनीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 12:52 PM

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी एकापेक्षा एक दमदार चित्रपटांत भूमिका साकारल्या आबेत. आज त्या मोठ्या पडद्यापासून दूर असल्या तरी सौंदर्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. रेखा यांचे चित्रपट जितके चर्चेत असायचे, तितकीच चर्चा त्यांच्या खासगी आयुष्याविषयी झाली, किंबहुना आजही होते. रेखा आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांचा हा किस्सा फार क्वचित लोकांना माहीत असेल. हेमा मालिनी यांनी रेखा यांच्या पतीची भेट घेतल्यानंतर त्यांना चकीत करणारा प्रश्न विचारला होता. ही घटना 1990 ची आहे. रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या दोघांनी मंदिरात गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर अभिनेत्री आणि रेखा यांच्या खास मैत्रीण हेमा मालिनी या त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. हेमा मालिनी यांची जेव्हा रेखा यांच्या पतीशी भेट झाली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया चकीत करणारी होती.

जेव्हा हेमा मालिनी यांनी मुकेश अग्रवाल यांना पाहिलं, तेव्हा त्या हळूच रेखा यांच्याकडे येऊन म्हणाल्या, “आता मला तू हेसांगू नकोस की तू या व्यक्तीशी लग्न केलं आहेस.” त्यावर रेखा उत्तर देत म्हणाल्या, “हे खरंय, आम्ही लग्न केलंय.” रेखा यांचं उत्तर ऐकून हेमा मालिनी थक्क होऊन विचारतात, “ते खूप श्रीमंत आहेत का?” यावर रेखा त्यांना काहीच उत्तर देत नाही. या घटनेचा उल्लेख यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. हा किस्सा वाचून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.

हे सुद्धा वाचा

दिल्लीचे व्यापारी मुकेश अग्रवाल यांच्यासोबत रेखा यांनी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 11 महिन्यातच मुकेश यांनी आत्महत्या केली. लग्नाच्या काही महिन्यांतच रेखा यांना समजलं होतं की त्यांचे पती नैराश्याचे शिकार झाले आहेत. तर दुसरीकडे मुकेश रेखा यांच्यावर फिल्म इंडस्ट्री सोडण्यासाठी दबाव आणत होते. या दोघांचे विचार एकमेकांशी जुळत नव्हते. त्यांच्यात वादविवाद होऊ लागले होते. एकेदिवशी रेखा एका स्टेज शोमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेली होती. त्यादरम्यान त्यांच्या नकळतच मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या मृत्यूला कोणीच जबाबदार नाही, असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.