
मुंबई : 18 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. असंच काही झालं आहे.. बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांच्यासोबत… सरोज खान आता या जगात नसल्या तरी त्यांचा संघर्ष फार खडतर होता… एक प्रसिद्ध कोरिओग्राफ म्हणून त्यांनी अनेक गाण्यांना नवा आकार दिला. पण त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ – उतार आले. आता सरोज खान यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमात चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सिनेमात अभिनेत्री माधुरी दीक्षित महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. तर सरोज खान यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेवू…
किशनचंद संधू आणि नोनी सिंग यांच्या घरात नागपाल यांचा जन्म झाला होता. ज्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार करत स्वतःचं नाव सरोज खान असं ठेवलं. वयाच्या १३ वर्षी सरोज खान ४३ वर्षीय नृत्य गुरू सोहनलाल यांच्यासोबत लग्न केलं. गुरुंसोबत लग्न केल्यानंतर पतीचं आधी लग्न झालेलं आहे आणि त्यांना चार मुलं देखील असल्याचं सत्य सरोज खान यांना कळलं. पतीचं सत्य समोर आल्यानंतर सरोज खान यांना मोठा धक्का बसला.
एवढंच नाही तर, पतीने सरोज खान यांच्या मुलांना स्वतःचं नाव देण्यास देखील नकार दिला. अशात सरोज खान यांच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. रोशन खान यांनी सरोज यांना लग्नाची मागणी घातली. पण सरोज खान यांनी रोशन खान यांच्या पुढे एक अट ठेवली… मुलांना स्वतःचं नाव द्यावं… असं अट रोशन खान यांच्यापुढे होती. सरोज यांनी अट रोशन खान यांनी मान्य केली.
अशात सरोज खान यांनी दुसरं लग्न रोशन खान यांच्यासबोत केलं. दुसऱ्या लग्नानंतर सरोज खान यांच्या मुलांना खान नाव मिळालं. रोशन खान यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. दुसऱ्या लग्नानंतर सरोज खान यांना पैशांची चणचण भासू लागली. त्यासाठी सरोज खान यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी शॉर्ट हॅन्ड टायपिंगचा देखील कोर्स केला.
त्यानंतर एका संधीमुळे सरोज खान यांचं पूर्ण आयुष्य बदललं. जेव्हा देवानंद यांनी ‘हरे रामा हरे कृष्णा’ सिनेमातील ‘दम मारो दम’ या प्रसिद्ध गाण्याचे कोरिओग्राफ करण्यासाठी साइन केलं. त्यानंतर सरोज खान यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. पण ‘दम मारो दम’ गाण्याच्या शुटिंग पूर्वी सरोज खान यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला…
सरोज खान यांच्या मुलीची प्रकृती गंभीर होती. पण स्वतःच्या मुलीचे प्राण सरोज खान वाचवू शकल्या नाहीत. सरोज खान यांनी ८ महिन्यांच्या मुलीला गमावलं.. ८ महिन्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर सरोज खान थेट कामासाठी सेटवर पोहोचल्या. मुलीच्या निधनानंतर सरोज खान ‘हरे राम हरे कृष्णा’ सिनेमातील ‘दम मरो दम’ गाणं कोरियोग्राफ करण्यासाठी निघाल्या..