डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा थेट फटका मुंबईत, हजारो कुटुंब संकटात, उद्योजक बेहाल, नोकऱ्या…
डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या 50 टक्के टॅरिफचा परिणाम आता भारतामध्ये दिसू लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी याकरिता दबाव टाकण्यासाठी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून जोरदार धक्का दिला आहे. आता मुंबईमधील काही व्यावसायिक संकटात आली आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून जगाला मोठा धक्का दिला. अगोदर 25 टक्के टॅरिफ लावला आणि त्यानंतर 25 याप्रमाणे. रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करा 25 टक्के टॅरिफ काढला जाईल, अशी ऑफर अमेरिकेने भारताला दिली. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट उठला असून भारतावर अजूनही निर्बंध लादण्याच्या तयारी ते आहेत. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा भारताच्या व्यापारावर वाईट परिणाम होताना दिसतोय. मुंबईतील अनेक कुटुंबांवर संकंट कोसळले असून पैसा मिळत नसल्याने खाण्यापिण्याचेही त्यांचे वांदे झाले आहे.
अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा परिणाम मुंबईत दिसत आहे. मुंबईमध्ये मोठा समुद्रकिनारा असल्याने सी फूड मार्केट देखील अत्यंत मोठे आहे. दररोज कोट्यावधीची उलाढाल याठिकाणी होते. 27 ऑगस्टपासून अमेरिकेने भारताच्या सी फूडवरही 50 टक्के टॅरिफ लावला आहे. याचा मुंबईतून अमेरिकेला जाणाऱ्या फ्रोजन सी फूडवर वाईट परिणाम झाला आहे. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या सी फूडला 10 टक्के टॅरिफ सुरूवातीला होता, त्यानंतर 25 टक्के करण्यात आला आणि आता थेट 50 टक्के. यामुळे सी फूड व्यावसायिकांचे तीन तेरा वाजले आहेत.
त्यांना मिळणारे उत्पन्न अत्यंत कमी झालंय. मुळात म्हणजे राज्यातील सर्वात मोठे समुद्री खाद्य निर्यात केंद्र हे मुंबईमध्ये आहे. मुंबईतील ससून डॉकमध्ये सी फूड उतरवणे, समुद्रात जाऊन जमा करणे, विक्री हे सर्व होते. मात्र, सध्या इथे चिंतेचे वातावरण आहे. अनेक कुटुंब मासेमारीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. अमेरिकेला सी फूड पाठवणे अवघड झाले आहे. टॅरिफ लागल्याने मिळणारा नफा अत्यंत कमी झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. टॅरिफमुळे मुंबईतील सी फूड व्यवसाय धोक्यात आल्याचे बघायला मिळत आहे.
यासोबत मिळणारा नफा कमी झाल्याने कामगारांची संख्या देखील कमी झाली आणि मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुढेही असेच सुरू राहिले तर अनेकांवर बेरोजगारी येऊ शकते. यामधून मार्गे कसा काढायला हा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. मुंबईतली टॅरिफमुळे तीनतेरा वाजल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.
