VIDEO : Harley Davidson वर बसून नवदीप सैनीने उडवला धुरळा, नेटिझन्स म्हणतात हिरोपंती कमी कर!

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने त्याच्या Harley Davidson मोटरबाईकवरुन धुळ उडवत एक स्टंट केला आहे. या व्हिडिओमुळे तो ट्विटरवर बराच ट्रोल होत आहे.

VIDEO : Harley Davidson वर बसून नवदीप सैनीने उडवला धुरळा, नेटिझन्स म्हणतात हिरोपंती कमी कर!
नवदीप सैनी

नवी दिल्ली : भारताचा युवा गोलंदाज नवदीप सैनीकडे (Navdeep Saini) टीम इंडियाचा (Team India) भविष्यातील महत्त्वाचा गोलंदाज म्हणून पाहिले जाते. नुकतेच त्याने टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण देखील केले. सैनीने रविवारी आपल्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे चाहते त्याला कमालीचे ट्रोल करत आहेत. (Indian Bowler Navdeep Saini Rides Motorbike Harley Davidson Fans Troller Over Twitter)

काय आहे व्हिडिओ?

या व्हिडिओमध्ये सैनी त्याची महागडी मोटरबाईक Harley Davidson वर बसून तिला एक्स्लरेट करत धुळ उडवत आहे. मजेशीर म्हणजे त्याने व्हिडिओला कॅप्शन देखील दिले आहे. ज्यात त्याने लिहिलय माझ्यासोबत बाईकवर बसा आणि भिती काय असते ते जाणून घ्या. (Accompany me on my bike to feel the fear)

चाहत्यांकडून ट्रोल

सैनीकडून हा व्हिडिओ पोस्ट होताच, त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत त्याला खूप ट्रोल केले. अनेकांनी सैनीला जपून बाईक चालव, खेळावर जास्त लक्ष दे तसंच हिरोपंती जरा कमी कर, अशाप्रकारचे सल्ले देत कमालीचे ट्रोल केले आहे.

संबंधित बातम्या 

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पुन्हा बदलणार, कोण असेल नवा कर्णधार?

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

(Indian Bowler Navdeep Saini Rides Motorbike Harley Davidson Fans Troller Over Twitter)