
अभिनेता मनोज बाजपेयी आणि त्याची पत्नी शबाना बाजपेयी यांनी 9 कोटी रुपयांना त्यांची अपार्टमेंट विकली आहे. मिनर्व्हा रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये असलेली ही अपार्टमेंट त्यांनी विकली आहे.

मुंबईतील महालक्ष्मी शेजारी ही अपार्टमेंट आहे. 2013 मध्ये अभिनेत्याने त्याच्या पत्नीसोबत मिळून 6.40 कोटी रुपयांना ही अपार्टमेंट खरेदी केली.

हे टॉवर लोखंडवाला कटारिया कन्स्ट्रक्शन्सने बांधले आहे. दोन एकर जमिनीवर 362 युनिट्स आहेत. 1,247 चौरस फूट किंवा 116 चौरस मीटर ही अपार्टमेंट अभिनेत्याची होती.

यासोबतच 22 चौरस मीटरच्या दोन कार पार्किंगच्या जागा होत्या. अभिनेत्याने ही अपार्टमेंट नेमकी कोणत्या कारणाने विकली हे कळू शकले नाहीये.

रिपोर्टनुसार मनोज बाजपेयी यांचे 47व्या मजल्यावर अपार्टमेंट आहे. 16 ऑगस्ट रोजी नोंदणी झालेल्या व्यवहारासाठी 54 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले.