Todays Gold Rate : अरे वा ! सोन्याची सुळक्कन घसरण, लगेच घ्या ज्वेलर्सकडे धाव… 10 ग्रॅम सोन्यासाठी आज दर किती ?

Todays Gold Rate : लग्नसराई असो किंवा एखादा घरगुती कार्यक्रम सोन्याची खरेदी काही कमी होती नाही. पण गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले दर यामुळे ग्राहकांनी सोन्याकडे पाठ फिरवली होती. पण आजचा दिवस सर्वसामान्य ग्राहकांसाठी शय आनंदाचा आहे. सोन्याच्या भावाने सुळक्कन खाली उडी मारली हे, तर चांदी देखील 2 हजारांपेक्षा अधिक घसरली आहे. आजचा सोन्या-चांदीचा भाव काय ? चला घेऊया जाणून

| Updated on: Feb 10, 2026 | 3:07 PM
1 / 6
सध्या सर्वत्र लग्नसराईची गडबड सुरू असून खरेदीला ऊत आला आहे. लग्न म्हटलं की दागिने हे आलेच, आणि  अनेकांचा भर हा सोन्या-चांदीच्या खरेदीवर असतो. पण सध्या सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेल्याने अेकांनी त्याकडे पाठ फिरवली. असं असलं तरी सोन्याच्या दरात चढ-उतार होतच असतात. आजचा 10 फेब्रुवारीचा दिवस ग्राहकांसाठी खास आहे, कारण आज सोनं- चांदीच्या भावात घसरण झाली . त्यामुळे ग्राहकांना आज मोठा फायदा होऊ शकतो.

2 / 6
गेल्या काही काळापासून सोनं- चांदी सतत वर चढत होतं. त्यामुळे लोकांचं दडपण वाढत होतं. मात्र आज तसं नाही,  आजचा दिवस ग्राहकांसाठी उत्तम ठरू शकतो. कारण सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झालेली पहायाल मिळत आहे.  जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 200 रुपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 60 हजार 474 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 76 हजार 40 रुपयांवर पोहोचले आहेत.

3 / 6
अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली, ज्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे आज एमसीएक्स सोन्याच्या एप्रिल फ्युचर्सच्या किमती कमी झाल्या. एमसीएक्स सोन्याचा भाव 2,065 रुपयांनी कमी 1 लाख 56 हजार 001 वर पोहोचला.

4 / 6
तर मार्च फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टसाठी MCX चांदीचा भाव 2 लाख 59 हजार 997 प्रति किलोवर उघडला, आधी बंद झालेल्या भावापेक्षा हा दर 2 हजार 623 रुपयांनी कमी आहे.

5 / 6
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आज 24 कॅरेज सोन्याचा दर 15 हजार 791 रुपये प्रति ग्रॅम, 22 कॅरेटसाठी हा दर 14,475 रुपये आणि 18 कॅरेट सोन्यासाठी हा दर 11,844 प्रति ग्रॅम आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये  24 कॅरेट सोनं  15,806 रुपये प्रति ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमसाठी 14 हजार 490 रुपये तर 18 कॅरेट सोन्यासाठी 11,859 रुपये ( प्रति ग्रॅम ) मोजावे लागतील.

6 / 6
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा कोणताही सल्ला दिलेला नाही. तुम्हाला जर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर आधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)