वाझेप्रकरणी शिवसेना एकाकी?, राष्ट्रवादी-भाजपच्या गाठीभेटी; नव्या समीकरणाचे संकेत?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. (shiv sena stand alone in Sachin Waze case, now why ncp-congress is behaving like bjp?)

वाझेप्रकरणी शिवसेना एकाकी?, राष्ट्रवादी-भाजपच्या गाठीभेटी; नव्या समीकरणाचे संकेत?
शरद पवार, उद्धव ठाकरे
| Updated on: Mar 19, 2021 | 3:01 PM

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणानंतर ठाकरे सरकारला मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करावी लागली आहे. या प्रकरणाने ठाकरे सरकारची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असून विरोधकांनीही हे प्रकरण लावून धरले आहे. एवढेच नव्हे तर मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या प्रकरणावरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात शिवसेना एकटी पडली आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरातून राज्यात नवे राजकीय समीकरण उद्भवणार तर नाही ना?, अशी चर्चा सुरू झाली आहे. (shiv sena stand alone in Sachin Waze case, now why ncp-congress is behaving like bjp?)

भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट का?

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. यावेळी रोहित यांनी दरेकरांना भला मोठा गुच्छ दिला. रोहित पवार आणि दरेकर यांनी या भेटीचं कोणतंही ठोस कारण दिलं नाही. दरेकरांनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे. वाझे प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. त्यामुळे शिवसेनेची मोठी अडचण झालेली आहे. असं असताना कोणत्याही कारणाशिवाय केवळ पवारांनी दरेकरांची सदिच्छा भेट घेतल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ निघत आहेत. ही सदिच्छा भेट दहा मिनिटांची होती. रोहित पवार पक्षाचा काही निरोप घेऊन दरेकरांकडे आले होते का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. अचानक झालेल्या या भेटीचे भेट देणाऱ्याने आणि भेट घेणाऱ्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने (की टाळल्याने) या भेटीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ही भेट म्हणजे शिवसेनेसाठी संकेत असल्याचंही बोललं जात आहे.

देशमुख कायम राहावेत म्हणून भेट

वाझे प्रकरणात शिवसेनेला विरोधकांनी घेरलं आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी विरोधक शांत झालेले नाहीत. विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसताना संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. मग अनिल देशमुख हे खातं सांभाळण्यात अपयशी ठरल्याने त्यांचाही राजीनामा का घेऊ नये, असं खुद्द शिवसेनेतूनच बोललं जात आहे. देशमुखांचा राजीनामा घेतल्यास वाझे प्रकरण थंड होईल, असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. देशमुखांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीवर शिवसेनेकडून दबाव वाढत चालल्यानेच रोहित पवार यांनी दरेकरांची भेट घेऊन शिवसेनेला राजकीय मेसेज दिला असावा, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

गृहमंत्र्यांवर शिवसेना नाराज?

अँटालिया प्रकरणी चौकशी सुरू असताना योग्य पद्धतीने तपास झाला नाही. त्याची माहिती मीडियाला योग्यरित्या दिली गेली नाही. तसेच गृहमंत्र्यांकडूनही समाधानकारक माहिती दिली गेली नाही. अनेकवेळा तर गृहमंत्र्यांऐवजी विरोधी पक्षनेत्याकडेच सर्वाधिक माहिती होती. त्यामुळे शिवसेनेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या अंतर्गत पोलीस खातं येतं. अशा वेळी गृहमंत्री देशमुख काय करत होते. त्यांची काहीच जबाबदारी नाही का? असा सवालही शिवसेनेच्या गोटातून केला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सत्ता के साथ भी, सत्ता के बाद भी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाचे अनेक अर्थ काढले जातात. पवारांचा अर्थ सत्ता के साथ भी, सत्ता के बाद भी असाही राजकारणात घेतला जातो. म्हणजे शरद पवार एक तर प्रत्यक्ष सत्तेत असतात किंवा सत्तेत नसतील तर सत्तेच्या जवळच असतात. 2014मध्ये मोदींची लाट असताना त्यांनी महाराष्ट्रात लगेचच भाजपला पाठिंबा दिला होता. मोदींच्या बाजूने लोकमत असल्याचं कारण देत त्यांनी पाठिंबा दिला होता. भाजपसोबत बार्गेनिंग करण्याची शिवसेनेची पॉवरच पवारांनी काढून घेतली होती. त्यानंतर आता संधी मिळताच त्यांनी शिवसेनेसोबत सत्ताही स्थापन केली. (shiv sena stand alone in Sachin Waze case, now why ncp-congress is behaving like bjp?)

केंद्रातही पवारच केंद्रस्थानी

भाजपने सचिन वाझे प्रकरण केवळ शिवसेनेपर्यंतच मर्यादित ठेवलं आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सवाल केले. परंतु हे सर्व प्रश्न शिवसेनेशी निगडीत होते. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर क्विचितच या प्रकरणी टीका केली. दुसरीकडे पवारांनीही एनआयएच्या तपासाबाबत सावध भूमिका घेत राष्ट्रवादीची बाजू सावरून धरली. अशा सर्व परिस्थितीत रोहित पवार यांचं दरेकरांना भेटणं नव्या राजकीय समीकरणाचे संकेत देत आहेत का? असा सवाल केला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच सध्या तरी राष्ट्रवादी सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन आहे. तर, शिवसेना महाराष्ट्रात एकाकी पडताना दिसत आहे. (shiv sena stand alone in Sachin Waze case, now why ncp-congress is behaving like bjp?)

 

संबंधित बातम्या:

आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!

 तीन कारणं, ज्यामुळे अनिल देशमुखांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता!

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणाची पवारांकडून माहिती, दिल्लीतील भेटीचे तपशील गृहमंत्र्यांनी सांगितले

(shiv sena stand alone in Sachin Waze case, now why ncp-congress is behaving like bjp?)