वृषभ राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : आज नवीन योजना मनात येईल, पती-पत्नीमध्ये विनाकारण काही वाद होऊ शकतात

भावांशी कोणत्याही कारणावरून वाद होऊ शकतो. ज्येष्ठ सदस्यांच्या मध्यस्थीने या वादाचे निराकरणही त्वरित केले जाईल.

वृषभ राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : आज नवीन योजना मनात येईल, पती-पत्नीमध्ये विनाकारण काही वाद होऊ शकतात
Todays taurus rashifal

Horoscope 26July, 2021:

तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? वृषभ राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 26 जुलैचं राशीफळ काय आहे.

Taurus Rashifal(वृषभ राशीफळ) 26 जुलै-

आज नवीन योजना मनात येईल. या योजना घर आणि व्यवसायासाठी उपयुक्त ठरतील. दिवस मनोरंजन करण्यात आणि स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यात खर्च होईल. नातेवाईकांचे आगमन तसेच घरात परस्पर सामोपचार केल्यामुळे घराचे वातावरण सुखद राहील.

भावांशी कोणत्याही कारणावरून वाद होऊ शकतो. ज्येष्ठ सदस्यांच्या मध्यस्थीने या वादाचे निराकरणही त्वरित केले जाईल. काही वेळ आत्मचिंतनावर घालवा, मनोबल चांगले राहील.

व्यवसाय क्षेत्रात सुधारणांसाठी बराच खर्च करावा लागेल. परंतु काळजी करू नका. यामुळे सिस्टम सकारात्मक आणि योग्य राहील. तरुण लोक कौटुंबिक व्यवसायातही रस घेतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळत राहील.

प्रेम संबंध – पती-पत्नीमध्ये विनाकारण काही वाद होऊ शकतात. परंतु एकमेकांना जरासे समजून घेतल्यास ही समस्याही सुटेल.

खबरदारी : भूक न लागणे, अपचन यांसारखे त्रास होतील. संतुलित आहार आणि नित्यक्रम राखणे गरजेचे आहे.

भाग्यवान रंग – गुलाबी
भाग्यवान अक्षर – ए
अनुकूल क्रमांक – 9

 

लेखक अजय भांबी-
डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI