AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shanidev | कुंडलीत असेल शनि, तर शनिवारी हे उपाय करा, शारीरिक आणि मानसिक समस्या सुटतील

शनिची अशुभ स्थिती राजाला रंकही बनवू शकते. ज्योतिषी या गोष्टीवर विश्वास ठेवतात की शनिवारी काही विशेष उपाय केले तर शनिचे अशुभ परिणामही शुभ प्रभावात रुपांतरित होऊ शकतात. जर तुम्हालाही शनिचे अशुभ परिणाम भोगावे लागत असतील तर हे उपाय करा (Do these upay on Saturday to get rid from Shani ashubh parinam).

Shanidev | कुंडलीत असेल शनि, तर शनिवारी हे उपाय करा, शारीरिक आणि मानसिक समस्या सुटतील
SHANI DEV
| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 8:35 AM
Share

मुंबई : शनि हा ज्योतिषशास्त्रात एक क्रूर ग्रह मानला जातो (Shani ashubh parinam), म्हणून त्यांचे नाव ऐकल्यानंतर लोक घाबरतात. पण शनि यांना कर्मफळ देणारा असेही म्हणतात. मान्यता आहे की, एखाद्या व्यक्तीच्या कर्मांनुसार भागवान शनि त्यांना फळ देतात. जर कुंडलीत शनि एखाद्या शुभ स्थानावर बसला असेल तर ते एखाद्या व्यक्तीला रंक ते राजा बनवू शकतात. पण, शनिची अशुभ स्थिती राजाला रंकही बनवू शकते. ज्योतिषी या गोष्टीवर विश्वास ठेवतात की शनिवारी काही विशेष उपाय केले तर शनिचे अशुभ परिणामही शुभ प्रभावात रुपांतरित होऊ शकतात. जर तुम्हालाही शनिचे अशुभ परिणाम भोगावे लागत असतील तर हे उपाय करा (Do these upay on Saturday to get rid from Shani ashubh parinam).

? 1. शनि जर कुंडलीच्या पहिल्या घरात बसून अशुभ प्रभाव देत असेल तर शनिवारी दुधात थोडी साखर मिसळून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाच्या झाडाला अर्पण करावे. ओल्या मातीने कपाळावर टिळा लावावा.

❇️ 2. जर शनि दुसऱ्या घरात अशुभ परिणाम देत असेल तर शनिवारी आपल्या कपाळावर दुधाचा किंवा दहीचा टिळक लावावा. तसेच सापाला दूध द्यावे.

? 3. तिसर्‍या घरात शनि बसून राहण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शनिवारी काळ्या तीळ, केळी आणि लिंबू दान करा. कुत्र्यांची सेवा करा आणि मांस आणि मद्यापासून दूर रहा.

❇️ 4. शनि चतुर्थ घरात बसले असल्यास होणारे अशुभ परिणाम टाळण्यासाठी शनिवारी म्हशी आणि कावळ्यांना नैवेद्य द्या. गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. आपल्या क्षमतेनुसार त्यांना दान करा. वाहत्या पाण्यात मद्य प्रवाहित करा.

? 5.पाचव्या घरात शनि बसलेले असताता होणारे अशुभ परिणाम टाळण्यासाठी आपल्या हातात लोखंडी अंगठी घाला आणि शनिवारी गरजूंना मूग दान करा.

❇️ 6. शनि जर सहाव्या घरातून अशुभ परिणाम देत असेल तर लेदर किंवा लोखंडी वस्तू खरेदी करा. शनिवारी पाण्यामध्ये काळी तीळ टाकून भगवान शंकराचा अभिषेक करावा.

? 7. कुंडलीच्या सातव्या घरात बसलेल्या शनिचा अशुभ परिणाम टाळण्यासाठी शनिवारी बासरीमध्ये साखर भरुन किंवा मधयुक्त भांडे एखाद्या निर्जन ठिकाणी पुरून ठेवा.

❇️ 8. आठव्या घरात शनिचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नेहमी आपल्याजवळ चांदीचे काहीतरी ठेवा. सापांना दूध द्या.

? 9. जर कुंडलीच्या नवव्या घरात शनिचा अशुभ प्रभाव पडला असेल तर घराचे छप्पर स्वच्छ ठेवावे आणि छपरावर रद्दी, लाकूड इत्यादी वस्तू छतावर ठेवू नयेत ज्या पावसात ओल्या झाल्याने खराब होतील. त्याशिवाय, चांदीच्या चौरस तुकड्यावर हळद लावून आपल्याबरोबर ठेवावे. पिंपळाच्या झाडाला दररोज पाणी द्यावे.

❇️ 10. दहाव्या घरात शनि असल्यास मंदिरात केळी आणि चणा डाळ अर्पण करा. शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. गुरुवारी उपवास ठेवा आणि मांस, मद्यपान इत्यादीचे सेवन करु नका.

? 11. कुंडलीच्या अकराव्या घरातील शनिचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी चांदीची वीट बनवा आणि ती आपल्या घरात ठेवा. शनिवारी शनिमंत्राचा 108 वेळा जप करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा.

❇️ 12. बाराव्या घरात शनिचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गरजूंना क्षमतेनुसार काळ्या डाळी, काळी तीळ, काळे कपडे इत्यादी दान करा. मांस आणि मद्यपान चुकूनही करु नये.

Do these upay on Saturday to get rid from Shani ashubh parinam

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

शनिचे दुष्परिणाम, राहू-केतूच्या वक्रदृष्टीपासून वाचायचं असेल तर शनिवारचा उपवास करा, जाणून घ्या पद्धत आणि महत्व आणि फायदे

Zodiac Signs | शनिदेवांना अत्यंत प्रिय असतात, यांच्यावर नेहमी देवाची विशेष कृपा असते

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.