AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन आशिया कपमधून बाहेर, आता कुठे खेळणार?

Indian Cricket Team : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघातून श्रेयस अय्यर याला वगळण्यात आलं. मात्र त्यानंतरही श्रेयस आशिया कप स्पर्धेआधी एका स्पर्धेत खेळणार आहे.

Asia Cup 2025 : टीम इंडियाचा स्टार  बॅट्समन आशिया कपमधून बाहेर, आता कुठे खेळणार?
Shami Surya KL Shryas Iyer Team IndiaImage Credit source: shreyas iyer X Account
| Updated on: Aug 20, 2025 | 6:05 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाचं चित्र स्पष्ट झालं आहे. बीसीसीाय निवड समिताीने मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया या स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृ्त्वात खेळणार आहे. तर शुबमन गिल याला कमबॅकसह उपकर्णधार म्हणून जबाबदारी मिळाली आहे. तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर याला निवड समितीने संधी दिली नाही.

श्रेयस गेल्या अनेक महिन्यांपासून टी 20i संघातून बाहेर आहे. भारतीय संघात संधी मिळाली नसली तरी श्रेयस दुसऱ्या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेला 28 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. श्रेयसचा या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करुन भारतीय संघात कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे.

श्रेयस दुलीप ट्रॉफीत खेळणार

देशांतर्गत क्रिकेट हंगामाला दुलीप ट्रॉफी स्पर्धेने सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला 28 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. श्रेयस अय्यरचा या स्पर्धेसाठी वेस्ट झोन संघात समावेश करण्यात आला आहे. ऑलराउंडर शार्दूल ठाकुर वेस्ट झोनचं नेतृ्त्व करणार आहे. वेस्ट झोनचा पहिला सामना हा 4 सप्टेंबरला होणार आहे. श्रेयसचा या सामन्यात मोठी खेळी करुन निवड समितीला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न असणार आहे.

श्रेयसने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर आयपीएलच्या 18 व्या मोसमात चाबूक कामगिरी केली होती.श्रेयसने आयपीएल 2025 मध्ये त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं होतं. मात्र आरसीबीने अंतिम सामन्यात पराभूत केल्याने पंजाबला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर ट्रॅक रेकॉर्ड पाहता श्रेयसला टी 20i संघात स्थान मिळेल असं वाटत होतं. मात्र निवड समितीने श्रेयसकडे दुर्लक्ष केलं. टीम इंडियाला आशिया कप स्पर्धेनंतर मायदेशात विंडीज विरुद्ध कसोटी मालिकेत भिडायचं आहे. या मालिकेत स्थान मिळवण्याकडे श्रेयसचं लक्ष असणार आहे.

विंडीज भारत दौऱ्यात एकूण 2 कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना हा 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी श्रेयसला करुण नायर याच्या जागी संधी मिळू शकते. करुणला इंग्लंड दौऱ्यात काही खास करता आलं नव्हतं.

श्रेयसची कसोटी कारकीर्द

श्रेयसने भारतासाठी 14 कसोटी सामन्यांमधील 24 डावांत 36.86 च्या सरासरीने 1 शतक आणि 5 अर्धशतकासह एकूण 811 धावा केल्या आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.