100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 19 August 2021
भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये अत्यंत चांगले व्यापारी संबंध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अफगाणिस्तानमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, आता तालिबानच्या सत्तेनंतर ही सर्व समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे.
अफगाणिस्तानात भारताला व्यापारी आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे. भारतीय निर्यात संघटनेचे संचालक डॉ. अजय सहाय यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तालिबानने व्यापारी मालाची वाहतूक बंद केली आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे मालाची ये-जा होत असे. मात्र, आता तालिबान्यांनी हाच मार्ग रोखून धरल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. भविष्यात तालिबानी प्रशासक काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष राहील, असे अजय सहाय यांनी सांगितले. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये अत्यंत चांगले व्यापारी संबंध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अफगाणिस्तानमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, आता तालिबानच्या सत्तेनंतर ही सर्व समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याविषयी विचारले असता त्यांनीही इतक्यात याबाबत बोलणे घाईचे ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

