Buldhana | बुलडाण्यात मद्यधुंद पोलिसांमुळे ट्रॅफिक जॅम, आमदार गायकवाडांनी कानशीलात लगावल्याचा दावा

मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या पोलिसांमुळे ट्रॅफिक जाम झाला आणि तेवढ्यात औरंगाबाद येथून बुलडाण्याकडे जाणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका पोलिसाला कानाखाली वाजवली. त्यानंतर ‘पोलीस’ लिहिलेली पाटी असलेल्या कारमध्ये बसून मद्यपी पोलिसांनी पळ काढला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Sep 06, 2021 | 8:12 AM

मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या कथित पोलिसाच्या कानाखाली शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी ‘आवाज’ काढला. बुलडाण्यात देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर ही घटना घडल्याची माहिती आहे. पोलिसाची पाटी लिहिलेली कार रस्त्यावर उभी करून काही जण नाचत होते, त्यामुळे ट्राफिकही जाम झाला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या पोलिसांमुळे ट्रॅफिक जाम झाला आणि तेवढ्यात औरंगाबाद येथून बुलडाण्याकडे जाणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका पोलिसाला कानाखाली वाजवली. त्यानंतर ‘पोलीस’ लिहिलेली पाटी असलेल्या कारमध्ये बसून मद्यपी पोलिसांनी पळ काढला. हा संपूर्ण प्रकार देऊळगाव महीजवळ असलेल्या सरंबा फाट्यावर रविवारी सायंकाळी घडला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. आपल्या वाहनावावर ‘पोलीस’ अशी पाटी लावून धुडगूस घालणारे हे नेमके कोण होते? आणि अशी पाटी लावणे योग्य आहे का? याबाबत पोलीस विभागाने आता आता चौकशी करणे गरजेचे आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें