बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट-बॉट’ सुविधेचे लोकार्पण, मोबाईलवर मिळणार 80 पेक्षा अधिक सुविधा

| Updated on: Jan 14, 2022 | 10:49 PM

नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा त्यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट-बॉट’ द्वारे सहजपणे उपलब्ध करून देणारी, बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली पालिका ठरली असून, आता नागरिकांना घर बसल्या विविध सेवांचा लाभ घेणे सहज शक्य होणार आहे.

Follow us on

नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा त्यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट-बॉट’ द्वारे सहजपणे उपलब्ध करून देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली पालिका असून, माहिती तंत्रज्ञानाचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे, महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले.