अंबादास दानवेंचा राज ठाकरे यांच्यावर पलटवार, म्हणाले कोणाच्या शापाने…
राज ठाकरे यांनी राजकारणात दिवस तेच राहत नाहीत ते बदलत असतात असं सांगत त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही खोचकपणे टीका केली आहे
मुंबई : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी आपले सडेतोड भाषण केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी केंद्रातील भाजपला सुनावत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी थेट हल्ला चढवला. याचदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत टीका केली. राज ठाकरे यांनी राजकारणात दिवस तेच राहत नाहीत ते बदलत असतात असं सांगत त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही खोचकपणे टीका केली आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीका करताना त्यांनी असे म्हटले की, माझ्या नादाला लागू नका, आता गेलं ना तुमचं मुख्यमंत्री पद म्हणत टीका केली. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार करताना कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असं म्हटलं आहे. तसेच मनसे हा भाजपच्या दावणीला बांधला गेलेला आहे अशी ही टीका केली.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

