Uddhav Thackeray : माझा पक्ष शिवसेनाच… नाव, निशाणी अन् वडील चोरले, ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा, हिंदुत्वावरून भाजपलाही घेरलं

Uddhav Thackeray : माझा पक्ष शिवसेनाच… नाव, निशाणी अन् वडील चोरले, ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा, हिंदुत्वावरून भाजपलाही घेरलं

| Updated on: Oct 05, 2025 | 10:10 AM

पुण्यातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर सडकून टीका केली. शिंदे यांना पक्ष चोर संबोधत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपच्या हिंदुत्वावरही त्यांनी चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांची उदाहरणे देत निशाणा साधला. न्यायव्यवस्थेतील विलंबावरही ठाकरेंनी उपरोधिक टिप्पणी केली.

पुणे दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिंदे गटाला चोर संबोधत त्यांनी पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगावरही त्यांनी टीका करत पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचे म्हटले.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना प्रकरणावर बोलताना, 2045-2050 पर्यंत न्याय मिळेल, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ठाकरे यांनी विचारले की, काँग्रेससोबत गेल्याने हिंदुत्व सोडले का? चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे हिंदुत्ववादी आहेत का? असा सवाल त्यांनी केला. भाजप जे करते ते अमरप्रेम आणि इतरांनी केले तर लव्ह जिहाद अशी दुहेरी भूमिका भाजपची असल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Published on: Oct 05, 2025 10:10 AM