Murder : ‘तिला कायमचं विसर’ प्रेयसीच्या वडिलांची धमकी न जुमानता तो म्हणाला ‘शक्यच नाही!’

भारतात ऑनर किलिंगच्या घटना कधी थांबणार? इंद्रजित प्रेमावर ठाम राहिला, पण प्राणाला मुकला

Murder : 'तिला कायमचं विसर' प्रेयसीच्या वडिलांची धमकी न जुमानता तो म्हणाला 'शक्यच नाही!'
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 1:35 PM

उत्तर प्रदेश : ऑनल किलिंगसारखा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये समोर आला आहे. एका मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रियकराला घरी बोलवलं. नंतर त्याची हत्या केली. शेवटी त्याचा मृतदेह नदीकिनारी जंगलात फेकून दिला. शिवाय पोलिसांना संशय येऊ नये म्हणून मुलीच्या वडिलांनी तिलाही जखमी केलं. हत्या करण्यात आलेल्या तरुणानेच आपल्या मुलीवर हल्ला केल्याचं भासवण्यासाठी मुलीच्या वडिलांनी हा प्रकार केल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे.

मुलाची हत्या करण्याआधी तरुणाला मुलीच्या वडिलांना खोटा बहाणा करुन घरी बोलावून घेतलं होतं. तू तिला कायमचं विसरुन जा, असा धमकी वजा इशाराही दिला होता. पण तरुणाने नकार दिल्याने वडिलांनी आपल्या मुलांच्या साथीने तरुणाची हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव इंद्रजित असल्याचं समोर आलं आहे.

हे हत्याकांड बिजनौर येथील दारानगर गंज इथं घडलं. इंद्रजित नावाच्या तरुणाचं शेजारी राहणाऱ्या आणि दहावीत शिकणाऱ्या मुलीवर प्रेम होतं. एका वर्षापासून इंद्रजित या मुलीच्या प्रेमात होता. अखेर एक दिवस मुलीच्या वडिलांनी शेजारी राहणाऱ्या इंद्रजितला बहाणा करुन घरी बोलावलं.

घरी आल्यानंतर इंद्रजितला मुलीच्या वडिलांनी तिला विसरुन जा, असं सांगितलं. तिचा विचार मनातून कायमचा काढून टाक, असा सल्लाही दिला. पण इंद्रजित प्रेमात आकंठ बुडाला होता. त्याने मुलीच्या वडिलांच्या धमकीला भीक घातली नाही.

इंद्रजित सांगूनही ऐकत नाही, हे पाहून मुलीच्या वडिलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी गळा आवळून इंद्रजितची जीव घेतला. आपल्या 3 मुलांच्या साथीने इंद्रजितची हत्या करुन त्याचा मृतदेह गंगा नदीच्या किनारी जंगलात फेकून दिला.

ही घटना 10 डिसेंबर रोजी घडली होती. इंद्रजितने आपल्या मुलीच्या छातीवर गोळी झाडून तो फरार झाला, असा बनाव मुलीच्या वडिलांनी रचला होता. पण हा कट अखेर उघडकीस आला. इंद्रजितची हत्या करुन मुलीच्या वडिलांना तिलाही जखमी केलं होतं. जखमी झालेल्या मुलीला वडिलांनी नंतर जिल्हा रुग्णालयातही उपचारासाठी दाखल केलं होतं. हे हत्याकांड रचणाऱ्या पित्याचं नाव राम असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आता याप्रकरणी पुढील तपास केला जातो आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....