Attempt to Murder | अनैतिक संबंधाचा संशय, पिंपरीत पतीकडून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न

Attempt to Murder | अनैतिक संबंधाचा संशय, पिंपरीत पतीकडून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न
पिंपरीमध्ये पतीकडून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न
Image Credit source: टीव्ही9

अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपी अमोल थोरात याने आपल्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिसरात ही घटना घडली आहे.

रणजीत जाधव

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 29, 2022 | 7:57 AM

पिंपरी चिंचवड : पतीने पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याची (Attempt to Murder) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात हा प्रकार घडला. अनैतिक संबंधाच्या संशयातून (Extra Marital Affair) पतीकडून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारानंतर आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. किवळे परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी आरोपी पती विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती अमोल थोरात याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपी अमोल थोरात याने आपल्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिसरात ही घटना घडली आहे.

पतीचे आत्मसमर्पण

हत्येचा प्रयत्न केल्यायानंतर पती स्वत: चिंचवड पोलीस ठाण्यात हजर झाला. चिंचवड पोलिसांनी आरोपीला देहू रोड पोलिसांच्या ताब्यात दिले. तिथे त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

अनैतिक संबंधांची कुणकुण, नवऱ्याने बायकोच्याच मदतीने प्रियकराचा काटा काढला

गर्लफ्रेण्डच्या नवऱ्याला दारु पाजली, नंतर वर्धा नदीत फेकलं, अपघात भासणाऱ्या हत्येचं गूढ कसं उकललं?

सीआरपीएफ जवानाची बायको, मेकॅनिकवर जीव जडला, अनैतिक संबंधातून जीव गमावला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें