डिलिव्हरी बॉयने जबरदस्तीने तरुणीला जबरदस्तीने किस; झोमॅटो कंपनीचे धक्कादायक स्पष्टीकरण

पोलिसांच्या कारवाईनंतर आता झोमॅटो कंपनीने याबाबत खुलासा केला आहे. झोमॅटो कंपनीने एक स्टेटमेंट जाहीर करत याबाबत स्पष्टीकरण दिला आहे.

डिलिव्हरी बॉयने जबरदस्तीने तरुणीला जबरदस्तीने किस; झोमॅटो कंपनीचे धक्कादायक स्पष्टीकरण
बोल बच्चन गँग अखेर जेरबंद
Image Credit source: tv9
वनिता कांबळे

|

Sep 20, 2022 | 4:15 PM

पुणे  : पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने(delivery boy) एका 19 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने किस (Kiss) केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पुण्यात घडली होती. झोमॅटो कंपनीचा हा डिलिव्हरी बॉय होता. झोमॅटो कंपनीने(Zomato company ) डिलिव्हरी बॉयच्या या कृत्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे डिलिव्हरी बॉय नेमका कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुण्यातील येवलेवाडी येथील एका हायप्रोफाईल एरियात ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 40 वर्षीय रईस शेख या डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे.

तक्रारदार तरुणीचे वय 19 वर्षे आहे. या तरुणीने शनिवारी रात्री झोमॅटोवरुन ऑनलाईन जेवण मागवले होते. रईस शेख हा रात्री 9.30 च्या सुमारास जेवणाचे या तरुणीने ऑर्डर केलेले जेवणाचे पार्सल घेऊन आला.

पार्सल दिल्यानंतर आरोपी रईसने तरुणीकडे पाणी पिण्यासाठी मागितले. तरुणीने त्याला पाणी दिले. यानंतर रईसने थँक यू म्हणत या तरुणीचा हात घट्ट पकडला.

हात घट्ट पकडून ठेवून रईसने या तरुणीला जवळ ओढले आणि तिच्या गालावर दोन किस घेतले. किस केल्यानंतर रईसने घटना स्थळावरुन धूम ठोकली.

या प्रकारामुळे तरुणी गोंधळून गेली. तिने तात्काळ कोंडवा पोलीस ठाणे गाठले आणि सर्व घडला प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉय विरोधात गुन्हा दाखल केला.

काही पोलिसांनी पोलिसांन रईसला शोधून काढले. कोंढवा परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांच्या कारवाईनंतर आता झोमॅटो कंपनीने याबाबत खुलासा केला आहे. या प्रकरणातला आरोपी रईस शेख हा झोमॅटो चा डिलिव्हरी बॉय नसल्याच झोमॅटो कंपनीकडून सांगण्यात आले आहे. झोमॅटो कंपनीने एक स्टेटमेंट जाहीर करत याबाबत स्पष्टीकरण दिला आहे.

आरोपी हा चहा कंपनीचा तो डिलिव्हरी बाय होता. त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत असल्याचेही झोमॅटोच्या मॅनेजमेंट बोर्डाने सांगितल आहे.

यापूर्वी देखील पुण्यात घडला होता असा प्रकार

पुण्यात फूड डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने अश्लील प्रकार केल्याची घटना यापूर्वी देखील घडली होती. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.

डिलिव्हरी बॉयने दोन अल्पवयीन मुलींना अश्लील स्पर्श करत केला विनयभंग केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गोपाळ यादव या आरोपीला अटक केली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें