AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Sood | ‘दोन पक्षांनी देऊ केलेल्या राज्यसभा सीट मी नाकारल्या…’, आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदचा दावा

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) या दिवसात करचोरीच्या आरोपांनी घेरला गेला आहे. आयटी अधिकाऱ्यांनी सोनूवर 20 कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर सोनू सूदने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.

Sonu Sood | ‘दोन पक्षांनी देऊ केलेल्या राज्यसभा सीट मी नाकारल्या...’, आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदचा दावा
Sonu Sood
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 12:22 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) या दिवसात करचोरीच्या आरोपांनी घेरला गेला आहे. आयटी अधिकाऱ्यांनी सोनूवर 20 कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर सोनू सूदने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनू म्हणाला की, ‘मी कधीही काहीही चुकीचे केले नाही, मला दोन वेळा राज्यसभा सीटची ऑफरही मिळाली होती, पण मी ती देखील स्वीकारली नाही.’

या संदर्भात त्याने माध्यमांशी जाहीर संवाद  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला की, ‘मी कोणताही कायदा मोडला नाही. तरीही,  आयकर अधिकाऱ्यांनी सलग 4 दिवस माझी चौकशी केली आहे. त्या चौकशीत त्यांनी जे काही प्रश्न विचारले, मी त्यांना अचूक उत्तरे दिली, त्यांना हवे ते कागदपत्र मी दिले.’

राज्यसभेच्या जागेची ऑफर दोनदा मिळाली!

सोनू सूदने पुढे सांगितले की, मला दोन पक्षांकडून राज्यसभा सीटच्या ऑफर आल्या आहेत. पण मी त्या नाकारल्या. सोनू सूदने असेही म्हटले आहे की, मी माझे काम केले, त्यांनी त्यांचे काम केले. त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले, आम्ही त्या प्रत्येकाची उत्तरे पूर्ण कागदपत्रांनीशी दिली आहेत आणि हे माझे कर्तव्य देखील आहे.

राजकारणाच्या प्रश्नावर सोनू म्हणतो…

त्यांच्या मागे ‘राजकीय हेतू’ असण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘मी अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेलो नाही. आणि मी सध्या शिक्षणावर काम करत आहे. मी खुल्या मनाचा आहे. जेव्हाही कोणतेही राज्य मला कॉल करेल, मी त्यांना नक्कीच मदत करीन. सोनूने सांगितले की, जे घडले ते पाहून मी अजिबात अस्वस्थ होणार नाही. किंवा मी थांबणार नाही, काम चालू राहील. अजून अनेक मैल बाकी आहेत आणि मी लोकांना मदत करण्यासाठी दिवस रात्र काम करत राहीन.’

मी कायद्याचे पालन करणारा नागरिक!

सोनू सूद आपल्या निवेदनात म्हणाला की, ‘अधिकाऱ्यांना जे हवे होते किंवा ज्याची गरज होती, आम्ही त्यांना ते सर्व दिले आणि भविष्यात त्यांना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. मला माझ्या देशाच्या कायदा व्यवस्थेबद्दल खूप आदर आहे. मी या देशाच्या कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी खात्रीशीरपणे सांगतो की, जर त्यांना रात्रीच्या वेळी काही हवे असेल, तर मी ते देखील त्यांना पुरवीन.’

एवढेच नाही तर, दुसर्‍या निवेदनात सोनू सूदने आयकर विभागाच्या कार्यवाहीवर असेही म्हटले होते की, तुम्हाला नेहमी तुमच्या बाजूने गोष्ट सांगण्याची गरज नसते. येणारी वेळ स्वतःच सर्व सांगेल.

गेल्या बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोनू सूदच्या सहा ठिकाणी छापे घातल्याची बातमी समोर आली होती. हे छापे सतत 4-5 दिवस चालू होते. आठवड्याच्या शेवटी, आयटी विभागाला त्यांच्याकडून सुमारे 20 कोटी रुपयांच्या कथित कर चोरीचा संशय आल्याची माहिती मिळाली. एवढेच नाही तर, आयकर विभागाला सोनू सूदच्या व्यावसायिक भागीदारांसोबत 240 कोटी रुपयांच्या इतर संशयास्पद सौद्यांचाही संशय आहे.

सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा?

प्राप्तिकर विभागाने सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा याची मोडस ऑपरेंडी स्पष्ट केली आहे. सोनू सूद हा बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज घेतल्याचे दाखवून बेहिशेबी पैसे आपल्या बँक खात्यात वळते करायचा. आयकर विभागाने सोनू सूदच्या घरी आणि संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये यासंबंधीची कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदने तब्बल 20 कोटी रुपयांची कर बुडवेगिरी केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

परकीय चलन कायद्याचेही उल्लंघन

सोनू सूदने परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडीदरम्यान काही कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदला मोठ्याप्रमाणावर परकीय चलनाच्या स्वरुपात देणगी मिळाली होती. हे पैसे त्याने खर्च केल्याचा संशय प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 : स्नेहा वाघच्या दोन घटस्फोटांच्या वक्तव्यावर भडकली काम्या पंजाबी, वाचा नेमकं काय झालं…

Sonu Sood on IT Raid : सोनू सूदने 20 कोटींच्या करचुकवेगिरीचे आरोप फेटाळले, उत्तर देताना म्हणाला ‘वेळ सांगेल…’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.