Dharmendra : ती पोकळी कधीच… धर्मेंद्र यांच्या आठवणीत जयदीप अहलावत भावूक
व्हर्सेटाइल अभिनेता जयदीप अहलावत यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. मात्र ते गेल्यावर, प्रमोशनदरम्यान कशी अवस्था होती, ते सांगताना जयदीप अहलावत भावूक झाले होते.

या वर्षाच्या सुरूवातीलात, 1 जानेवारी रोजी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra ) यांचा ‘इक्कीस’ हा शेवटचा चित्रपट रिलीज झाला. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाची कामगिरी यथा-तथाच असली तर लोकांच्या मनात, हृदयात या चित्कपटाचे खास स्थआन राहील. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले. त्यांनी मागे सोडलेला भव्य वारसा पुढली अनेक वर्ष लोकांच्या स्मरणात राहील. अलीकडेच, अभिनेता जयदीप अहलावत हे धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावूक झाले. ‘ इक्कीस’मध्ये त्या दोघांनी शेवटचं एकत्र काम केलं होतं.
या चित्रपटात जयदीपने पाकिस्तानी ब्रिगेडियर जान निसारची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याचे सर्व सीन धर्मेंद्रसोबत होते. त्यामुळे त्यांनी भावनिक पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला.
जयदीप अहलावत भावूक झाले
एका मुलाखतीत जयदीप अहलावत हे धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलले. “मला वाटतं संपूर्ण देशात, सर्व सिनेमाप्रेमींमध्ये असा एकही व्यक्ती असा नसेल ज्याला वाईट वाटलं नसेल. ‘इक्कीस’ चं प्रमोशन करताना मला एक पोकळी जाणवली, ती पोकळी भरणार नाही. किती छान झालं असतं जर ते ( धर्मेंद्र) आपल्यासोबत असते, सगळ्या प्रमोशनमध्ये असते. आमच्यासोबत ते चित्रपट पहायला आले असते, त्यांचा परफॉर्मन्सही त्यांनी बघितला असता. असो , ही फक्त एक पोकळ कल्पना आहे. आता निशबापुढे, कोणाचं काही चालत नाही” असं अहलावत म्हणाले.
धर्मेद्र यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा ?
पुढे जयदीप हलावत यांनी धर्मेंद्रसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला.”या प्रोजेक्टचा भाग असणं, हे मला माझं नशीब वाटतं. तिथे ते लिजंड स्वत:होते ना. त्यांच्यासोबत काम करून खूपच मजा आली. आपण एखाद्या,एवढ्या मोठ्या लिडंडसोबत काम करतोय असं वाटलं नाही. त्यांनी मला त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागवलं. ते सतत मजेशीर जोक सांगायचे, छोटे-छोटे वन लायरन जोक्स ऐकवायचे. खूप सुंदर कविता ऐकवायचे, गोष्टी सांगायचे. त्यांच्यासोबत काम करून खरंच खूप बरं वाटलं ” अशा शब्दात जयदीप अहलावत यांनी तो सुखद अनुभव शेअर केला.
“इक्कीस” या चित्रपटामध्ये दिग्गज अभिनेता असरानी हेही झळकले. त्यामध्ये त्यांची एक छोटी भूमिका होती ज्यामध्ये ते आणि धर्मेंद्र एकत्र दिसले होते. हा सीन अनेक सिनेमाप्रेमींसाठी खास ठरताना दिसत आहे. 1 जानेवारीला रिलीज झालेल्या ‘इक्कीस’ मध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया यांनी डेब्यू केलं.
