AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूपीला जाताना मध्येच उतरवलेल्या मजुराचा मृत्यू, स्वॅब न घेताच अंत्यसंस्कार, ट्रकमधील आणखी एक पॉझिटिव्ह

ज्या ट्रकमधून मजूर गावाकडे निघाले (Old Man dies wardha) त्याच ट्रकमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर मग मात्र विदारक चित्र समोर येतं.

यूपीला जाताना मध्येच उतरवलेल्या मजुराचा मृत्यू, स्वॅब न घेताच अंत्यसंस्कार, ट्रकमधील आणखी एक पॉझिटिव्ह
| Updated on: May 19, 2020 | 8:41 PM
Share

वर्धा : जीव मुठीत घेऊन गावाकडे निघालेला मजुरांची तारांबळ आपण पाहिली. पण ज्या ट्रकमधून मजूर गावाकडे निघाले (Old Man dies wardha) त्याच ट्रकमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर मग मात्र विदारक चित्र समोर येतं. असाच प्रकार वर्ध्यातील कारंजा घाडगे तालुक्यात समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी ट्रकमधून उतरवलेल्या एक 80 वर्षीय वृद्धाचा वाटेतच मृत्यू झाला. प्रशासनाने या वृद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील केले. पण आता त्याच्यासोबतच कारंजा येथे उतरलेल्या त्याच्या 52 वर्षीय सहकाऱ्याचा स्वॅब मात्र पॉझिटिव्ह आला आहे. सहकाऱ्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनात खडबळ उडाली आहे. ट्रकमधून निघून गेलेल्या इतर सहकारी मजुरांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Old Man dies wardha)

मुंबई येथून 16 मे रोजी गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे जाणारा ट्रक कारंजा घाडगे तालुक्यातील सारवाडी येथे 17 मे रोजी संध्याकाळी  पोहचला. अचानक ट्रकमधील एका 80 वर्षीय वृद्धाची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला ट्रकचालकासह सहकारी प्रवाशांनी खाली उतरविले. पण अचानक त्याचा तिथेच मृत्यू झाला.

मृत्यूनंतर अंत्यसंस्कार देखील झाले, पण अंत्यसंस्कारापूर्वी स्वॅब घेतले नाहीत. मात्र त्या वृद्धाचा सहकारी आणि घटनास्थळावर जाणाऱ्या डॉक्टरांना त्यावेळी क्वारंटाईन करण्यात आले. आज मृत वृद्धाच्या सहकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाला नेमका कोरोना कुणापासून झाला? त्या ट्रकमध्ये किती मजूर होते? नेमका हा रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आला याचा विचार करुनच प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. शिवाय हा ट्रक पुढे उत्तर प्रदेशाकडेही गेला आहे.

एकीकडे आरोग्य अधिकाऱ्यांकडून मृतदेह आढळलेल्या ठिकाणासह अंत्यसंस्कार नियमाप्रमाणे केले असल्याचा दावा केला जात असला, तरी मृतकाचे नमुने का घेण्यात आले नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सारवाडीनजीक पोहोचून रुग्णाला उतरवून देणारा ट्रक नेमका किती रुग्णांना घेऊन पुढे निघाला आहे. ट्रकचा नंबर काय, तो कुठे पोहोचला असेल याबाबत अद्याप प्रशासनाला माहितीच नाही. तपासणी नंतरच रुगणाबद्दल महिती समोर आल्यामुळे बऱ्याच बाबी समोर येऊ शकल्या नाहीत.

आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार श्वसनाचा त्रास आणि ताप असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयातील व्यक्तीचे आणि स्थलांतरित व्यक्तीचे स्वॅब घेऊन चाचणी करणे बंधनकारक आहे. पण अशा गाईडलाईन असताना देखील त्या पाळण्यात येत नाहीत याचेच आश्चर्य आहे.

मृतक असलेल्या वृद्धाचा अंत्यसंस्कार कोण करणार यावरून कारंजा पोलीस आणि आरोग्य प्रशासनामध्ये देखील वाद झाल्याची चर्चा आहे. या वादात अखेर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. वृद्धाचा स्वॅब घेतला गेला असता तर कदाचित तो देखील पॉझिटिव्ह निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना क्वारंटाईन केले जात आहे. तर काही डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

या गंभीर प्रकारात अद्याप ट्रकचा सुगावा लागला नसला तरीही मुंबई ते गोरखपूर प्रवासात नेमका हा ट्रक किती जणांना बाधित करुन गेलाय हा प्रश्नच आहे.

(Old Man dies wardha)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.