Monsoon Session | देश सोडून जाणं एवढं सोपंय? 3 वर्षात 4 लाख नागरिकांनी भारत सोडला, संसदेत महत्त्वपूर्ण माहिती उघड!

भारतातील वाढती लोकसंख्या देखील याचे एक कारण बोलले जाते. भारतात लोकसंख्या जास्त असल्याने स्पर्धा देखील जास्त आहे, त्या तुलनेत विदेशात स्पर्धा देखील कमी असल्याने सहज नोकरी लागण्यास मदत होत असल्याने अनेकजणांची पाऊले विदेशाच्या दिशेने जातात.

Monsoon Session | देश सोडून जाणं एवढं सोपंय? 3 वर्षात 4 लाख नागरिकांनी भारत सोडला, संसदेत महत्त्वपूर्ण माहिती उघड!
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 19, 2022 | 3:13 PM

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) दुसऱ्या दिवशी मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची आकडेवारी संसदेत आज जाहिर केलीयं.  ही आकडेवारी सादर करताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी माहिती दिली की, गेल्या तीन वर्षांत सुमारे 4 लाख नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे आणि ही आकडेवारी धक्कादायक आहे. नित्यानंद राय यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2019, 2020, 2021 या वर्षांमध्ये भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) सोडणाऱ्या भारतीयांची संख्या अनुक्रमे 144017, 85256 आणि 163370 आहे.

इथे पाहा ANI ने शेअर केलेले ट्विट

2021 मध्ये सर्वात जास्त भारतीय नागरिकत्व सोडले गेले

भारतीय नागरिकत्व सोडण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये विदेशात नोकरीची संधी असल्याने अनेकजण तिथेच स्थायिक होतात. तसेच भारतातील वाढती लोकसंख्या देखील याचे एक कारण बोलले जाते. भारतात लोकसंख्या जास्त असल्याने स्पर्धा देखील जास्त आहे. त्या तुलनेत विदेशात स्पर्धा कमी असल्याने सहज नोकरी लागण्यास मदत होत असल्याने अनेकजणांची पाऊले विदेशाच्या दिशेने जातात. तीन वर्षांच्या तुलनेत बघितले तर लक्षात येईल की, 2021 मध्ये सर्वात जास्त भारतीय नागरिकत्व सोडण्यात आले.

तीन वर्षांत तब्बल 3,92,643 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले

मंत्री नित्यानंद राय यांच्या आकडेवारीनुसार या तीन वर्षांत तब्बल 3,92,643 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडल्याचे स्पष्ट झाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज पुन्हा एकदा गोंधळ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आज संसदेबाहेर आंदोलन केले आहे. तर विरोधी पक्षाने महागाई, डेअरी खाद्यपदार्थांवर नव्याने लावण्यात आलेला जीएसटी याचा विरोधात हंगामा केला. संसदेच्या दोन्ही सभागृहात महागाई आणि जीएसटी दरवाढीविरोधात विरोधी पक्षांचा गदारोळ पुन्हा एकदा बघायला मिळाला.