पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू; कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:54 PM, 11 Jan 2021
Modi Govt

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू असून, कोरोना लसीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आलीय. बैठकीत कोरोना लसीच्या वितरणावरही चर्चा करण्यात आलीय. बैठकीत कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि 16 जानेवारीला सुरू होणाऱ्या लसीकरणावर चर्चा होणार आहे. शनिवारी कोरोनाच्या संकटात सद्यस्थिती आणि लसीकरण केंद्रस्थानी ठेवून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावलीय. (PM Modi Interact With Cms Over Vaccine Rollout Covid 19 Situation Across Country)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लसीकरणाच्या अभियानाला देशातील सर्वात मोठं लसीकरणाचं अभियान म्हटलं आहे. यात प्राथमिक टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कार्यकर्त्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठीच पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत.

लसीकरणाला मिळाली आपत्कालीन वापरास मान्यता
ड्रग्ज रेग्युलेटर ऑफ इंडियाने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) द्वारे निर्मित ऑक्सफोर्डच्या कोरोना लसी कोविशील्ड आणि भारत बायोटेकला भारतात आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती.

कोरोनाच्या संक्रमणातील प्रकरणे झाली कमी
भारतातील कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या प्रकरणात कमी आलेली आहे. जगभरात कोरोनाच्या संक्रमणाच्या बाबतीत भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या नंबरचा देश आहे. अमेरिकेत आता दोन कोटींहून अधिक प्रकरणं समोर आलेली आहे, जी भारतापेक्षा जवळपास दुप्पट आहेत. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनानं 3.7 लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. भारत या प्रकरणात ब्राझीलनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या

कोरोना लसीकरण: तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट आहे का? नसेल तर काय होणार?

भंडारा रुग्णालय दुर्घटनेमधील पीडित कुटुंबांना मोदी सरकारची मोठी मदत

PM Modi Interact With Cms Over Vaccine Rollout Covid 19 Situation Across Country